spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बॅनर लाऊन मुख्यमंत्री होता येत नाही, जनतेच्या मनात असावं लागत, Pravin Darekar यांचा Uddhav Thackeray यांना टोला

शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज (शनिवार, २७ जुलै) ६५ वा वाढदिवस असून मातोश्री बाहेर शिवसैनिकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त (Uddhav Thackeray Birthday) शिवसैनिकांनी जागोजागी मोठमोठे बॅनर्स लावून त्यांना शुभेच्छादेखील दिल्या आहेत. त्यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला बॅनर लावला आहे. त्यावरून आता, भाजप (BJP) नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आज माध्यमांशी संवाद साधताना प्रवीण दरेकर यांनी यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत, ‘त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आहे, मात्र बॅनर लाऊन मुख्यमंत्री होता येत नाही, जनतेच्या मनात असावं लागत,’ असे वक्तव्य केले आहे.

प्रवीण दरेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत ते म्हणाले, “त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आहे, मात्र बॅनर लाऊन मुख्यमंत्री होता येत नाही, जनतेच्या मनात असावं लागत. त्यांना शुभेच्छा देतो, त्यांना उत्तम आरोग्य लाभो. बाळासाहेबांनी त्यांना जो बाळकडू दिला आहे, तो त्यांनी पुढे नेवो, त्यांना यासाठी शक्ती लाभो,” असे ते म्हणाले.

काल (शुक्रवार, २६ जुलै)भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही उद्धव ठाकरेंना ऍडव्हान्समध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, “कुठल्याही राजकीय पक्षात असलो तरी कोणाला शुभेच्छा देण्यात गैर नाही. संसदीय परंपरा असते, त्याच्यात वाईट किंवा गैर नाही,” असे ते म्हणाले.

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही उद्धव ठाकरेंना ऍडव्हान्समध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे, महाराष्ट्रात पुन्हा नव्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळतात की काय ? असे चित्र दिसू लागले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा वाढदिवस आहे, “त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा द्यायला आवडतील!” असे विधान भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. यापूर्वी ही चंद्रकांत पाटील विधिमंडळ अधिवेशन काळामध्ये पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अँड अनिल परब यांना निकालापूर्वीच भेटले आणि विजयाच्या शुभेच्छा ॲडव्हान्स मध्ये दिल्या होत्या.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत, ‘आम्ही एकमेकांचे शत्रू थोडीच आहोत,’ असे वक्तव्य केले आहे. यामुळे, अनेकांच्या भुवया उंचावल्या असून नेहमी एकमेकांवर टीका करणारे ठाकरे – फडणवीस हे पुन्हा एकत्र येणार का? अश्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हंटले, “वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचं पाहिजे. आम्ही एकमेकांचे शत्रू थोडीच आहोत, पण बाकी शुभेच्छा कोण कुठे देते हे महत्वाचं..” फडणवीस यांनी हे सूचक वक्तव्य केल्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का? अश्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

 

Uddhav Thakeray Birthday: रश्मी-उद्धव ठाकरे यांचे मैत्रीचे रूपांतर प्रेमात कसे झाले? जाणून घ्या हा प्रेमप्रवास…

राज्यातील पूरपरिस्थितीमुळे “धर्मवीर-२” चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले; निर्मात्यांचा अनोखा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss