उद्धव ठाकरेंच्या विरोधात प्राथमिक सुनावणी पडली पार

उद्धव ठाकरेंच्या विरोधात प्राथमिक सुनावणी पडली पार

काही दिवसांपासून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अडचणीत वाढत होत असल्याचं दिसून येत आहे. उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांनी बेहिशोबी मालमत्ता (intangible assets) गोळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गौरी भिडे यांनी उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांनी बेहिशोबी मालमत्ता जमावल्याचा आरोप करत, मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणावर आज सुनावणी झाली. हायकोर्टानं (High Court) या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला आहे.

उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांच्या बेहिशोबी मालमत्ता आरोपाप्रकरणी आज उच्च न्यायालयात न्यायमूर्ती डि.सी. ठाकूर आणि न्यायमूर्ती व्ही. एस. मेनेझेस (ustice V. S. Menezes) यांच्या खंडपीठापुढे प्राथमिक सुनावणी पार पडली. या प्रकरणातील निकाल राखून ठेवण्यात आला आहे. गौरी भिडे यांनी दाखल केलेली ही याचिका सुनावणीस योग्य आहे की नाही? यावर आता कोर्ट निर्णय देणार आहे. हाय कोर्टाने जर ही याचिका सुनावणीस योग्य आहे असा निर्णय दिल्यास उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणी वाढू शकतात.

गैरी भिडे (Gauri Bhide) यांनी बेहिशोबी मालमत्ता जमावल्याचा आरोप उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांवर केला आहे. त्यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज प्राथमिक सुनावणी पार पडली. या प्रकरणाचा निकाल हायकोर्टाने राखून ठेवला आहे. ही याचिका सुनावणीस योग्य आहे की नाही याबाबत आता कोर्ट निर्णय देणार आहे. त्यामुळे आता कोर्ट ही याचिका फेटाळून लावणार की सुनावणीसाठी मंजुरी देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा : 

ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर नागपूरहून तब्ब्ल ३० विशेष गाड्या

‘सिंघम अगेन’मध्ये ‘हि’ प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार ‘लेडी सिंघम’च्या भूमिकेत

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version