Morbi Bridge Collapse : मोरबी दुर्घटनेतील जखमींची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Morbi Bridge Collapse : मोरबी दुर्घटनेतील जखमींची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी (१ नोव्हेंबर) मोरबी पूल दुर्घटनेसंदर्भात उच्चस्तरीय बैठक झाली. ज्यामध्ये पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. पीएम मोदींनी मंगळवारी मोरबी येथील घटनास्थळाला भेट दिली. यासोबतच त्यांनी मोरबीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमींची भेट घेतली. या अपघातात आतापर्यंत १३५ जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधानांनी बैठकीत सांगितले की, अधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबांच्या संपर्कात राहावे आणि त्यांना या दु:खाच्या वेळी सर्वतोपरी मदत मिळेल याची खात्री करावी. अधिका-यांनी पंतप्रधानांना बचाव कार्य आणि बाधित लोकांना करण्यात आलेल्या मदतीची माहिती दिली.

हेही वाचा : 

Michael Jackson : मायकेल जॅक्सनला ब्रिटनच्या राजकुमारी सोबत लग्न करायचे होते, खुलासा केला बॉडीगार्डने

पीएम मोदी म्हणाले की, या अपघाताशी संबंधित सर्व पैलू ओळखून सविस्तर आणि सर्वसमावेशक तपास करणे ही काळाची गरज आहे. या बैठकीत मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, गृह राज्यमंत्री हर्ष संघवी, गुजरात सरकारमधील मंत्री ब्रिजेश मेरजा, गुजरातचे मुख्य सचिव, राज्याचे डीजीपी, स्थानिक जिल्हाधिकारी, एसपी, पोलिस महानिरीक्षक, आमदार आणि खासदार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, आज अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेले आहेत. पूल बनवणाऱ्या कंपनीकडून भाजपला फंडिंग होत होतं, हे खरं आहे का? असं केजरीवाल म्हणाले. राज्यात एवढी गंभीर दुर्घटना घडलेली असतांना मुख्यमंत्र्यांनी पदावर राहू नये, सरकारने पायउतार व्हावं, असंही आवाहन त्यांनी केलं.

उद्धव ठाकरेंचा बुलढाणा दौरा तर आदित्य ठाकरे करणार मराठवाडा दौरा

मोरबी ब्रिज १४३ वर्षांचा होता

मोरबीची शान म्हटला जाणारा केबल ब्रिज १४३ वर्षांचा होता. ७६५ फूट लांब आणि ४ फूट रुंद असलेला हा पूल ऐतिहासिक असल्यामुळे गुजरात पर्यटनाच्या यादीतही समाविष्ट झाला होता. स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीश राजवटीत मोरबी पूल बांधण्यात आला होता. मच्छू नदीवर बांधलेला हा पूल मोरबीचे प्रमुख पर्यटन स्थळ होते. केबल ब्रिज (स्विंगिंग ब्रिज) मोरबीचे राजा वाघजी राव यांनी बांधला होता. ज्याचे उद्घाटन १८७९ मध्ये झाले. ब्रिटीश अभियंत्यांनी बांधलेल्या या पुलाच्या बांधकामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात, पायी चालण्यासाठी राज्यातील नेत्यांची ‘कसरत’ सुरू

Exit mobile version