spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं खास मराठीत ट्विट, मुंबई दौऱ्यासंदर्भात दिली ‘ही’ विशेष माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Mod) आज मुंबईत येणार आहेत. आज पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Mod) हस्ते मुंबईतील अनेक विकास कामांना चालना मिळेल. तसेच पूर्ण झालेल्या विकास कामांचे उद्घाटन देखील होणार आहे. त्याचबरोबर काही विकास कामांचं लोकार्पणही करण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबईत बीकेसी (BKC Ground) मैदानावर एका विराट सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे या सभेत मोदी काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेलं आहे. कारण मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंगही या दौऱ्यातून फुंकलं जाणार आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Mod) यांनी आजच्या त्यांच्या मुंबई दौऱ्यासंदर्भात ट्विट करत विशेष माहिती पुरवली आहे. मुख्य म्हणजे पंतप्रधानांनी (PM Narendra Mod) हे ट्विट मराठीत केलं असून दौऱ्यासंदर्भात माहिती पुरवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, मी मुंबईत असेन. ३८,००० कोटी रु. खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे. यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणे, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसेच आणखी कामांचा समावेश आहे. या कामांमुळे राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास चालना मिळेल,असे पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विट मध्ये लिहिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्विटवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अनेक नेत्यांनी रिप्लाय देत मुंबईत स्वागत केलं आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Mod) केलेल्या ट्विटला रिप्लाय देत म्हटले आहे की, ‘मुंबई नगरीत आपले मन:पूर्वक स्वागत आहे. आपल्या शुभ हस्ते मुंबईतील विविध महत्त्वकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे.या माध्यमातून मुंबईचा नक्कीच कायापालट होणार आहे, हा विश्वास आहे’, असे लिहीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांचे मुंबईत स्वागत केले आहे. त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईतील बीकेसी मैदानावर (BKC Ground) आज दुपारी ४ वाजता विराट सभा पार पडणार आहे. यावेळी मोदी महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करणार आहेत.

हे ही वाचा:

२० जानेवारीला साजरा होणार मूवी लव्हर्स डे, ‘अवतार २’ सह हे चित्रपट पहा फक्त ९९ रुपयात

“तर मी स्वतःला फाशी लावून घेईन” लैंगिक शोषणाच्या आरोपांवर बृजभूषण सिंहांनी दिली प्रतिक्रिया

मोदींच्या दौऱ्यामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत केले बदल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss