पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूमधून लढवणार निवडणूक ???

आगामी होणाऱ्या पुढील वर्षासाठी म्हणजे २०२४ मध्ये देशात लोकसभेच्या निवडणुका (loksabha Election 2024) होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूमधून लढवणार निवडणूक ???

आगामी होणाऱ्या पुढील वर्षासाठी म्हणजे २०२४ मध्ये देशात लोकसभेच्या निवडणुका (loksabha Election 2024) होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी राजकीय गणितं बांधायला सुरुवात केली आहे. भाजपने (BJP) देखील आत्तापासूनच निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे २०२४ ची लोकसभा निवडणूक तामिळनाडूमधून (Tamil Nadu) लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, ते तामिळनाडूमधून निवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याचे वृत्त टेलिग्राममध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यामुळे नरेंद्र मोदी स्वतः रणनीती आखताना दिसत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या महिन्यात संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी लोकसभेच्या दालनात सभापतींच्या खुर्चीशेजारी पवित्र सेंगोल अर्थात राजदंड स्थापित करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तामिळनाडूचे पुजारी उपस्थित होते. त्यांचा उद्देश हिंदुत्वाला पुढे नेण्याचा असल्याचे टेलिग्राममध्ये म्हटलं आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी हे पुढील वर्षी लोकसभा निवडणूक दक्षिणेकडील राज्यातून, प्राधान्याने तामिळनाडूमधून लढवण्याचा गंभीरपणे विचार करत असल्याचे टेलिग्राममध्ये म्हटलं आहे. जर पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूमधूव लोकसभेची निवडणूक लढवली तर ते दुसऱ्या ठिकाणी म्हणजे सध्याच्या वाराणसी मतदारसंघातूनही निवडणूक लढवतील असंही टेलिग्राममध्ये सांगण्यात आलं आहे.

पंतप्रधान मोदींनी यांच्या कारकिर्दीत २०१४ मध्ये वडोदरा आणि वाराणसी या दोन जागांवर निवडणूक लढवली होती. तर २०१९ मध्ये त्यांनी फक्त वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, यावर्षी तामिळनाडू आणि वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याचे माहिती टेलिग्राममध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. तामिळनाडूमधील एका मतदारसंघाचा पंतप्रधान मोदी यांच्यासाठी विचार केला जाऊ शकतो. तो मतदारसंघ म्हणजे रामनाथपुरम या मतदारसंघात रामेश्वरम हे हिंदू तीर्थक्षेत्र आहे. भाजपच्या रणनितीचा एक भाग म्हणून पंतप्रधान मोदी तामिळनाडूमधून लोकसभेची निवडणूक लढवू शकतात, याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. मागील काही दिवसापूर्वी तामिळनाडू भाजपचे प्रमुख के. अन्नमल्लई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतून निवडणूक लढवण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतरपासून हा मुद्दा चर्चेत आला आहे.

दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात मिळून लोकसभेच्या एकूण १२९ जागा आहेत. पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातही एक जागा आहे. २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकणाऱ्या भाजपला या १३० जागांपैकी फक्त २९ जागा मिळाल्या आहेत. त्यात कर्नाटकातील 25 जागांचा समावेश आहे. दक्षिणेकडील तीन राज्यांमध्ये (तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश) भाजपचे खातेही उघडले नाही. सर्व्हेनुसार, आता निवडणुका झाल्यास महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहारमध्ये भाजपला झटका बसू शकतो. अशा परिस्थितीत दक्षिणेकडील इतर राज्यांतून कमी झालेल्या जागांची भरपाई भाजप करू शकतो.

हे ही वाचा:

Shinde पिता – पुत्रांनी यांनी स्वतः भोवतालचं कोंडाळं तपासण्याची गरज! | Uday Tanpathak Interview

शिबिराच्या माध्यमातून उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version