spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पृथ्वीराज चव्हाण यांनी टाकला राजकीय बॉम्ब

आगामी लोकसभेच्या निवडणुकांचा विचार केल्यास एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप ही निवडणूक लढणार नाही, कारण ठाण्याबाहेर त्यांचा फारसा प्रभाव दिसत नाही.

आगामी लोकसभेच्या निवडणुकांचा विचार केल्यास एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप ही निवडणूक लढणार नाही, कारण ठाण्याबाहेर त्यांचा फारसा प्रभाव दिसत नाही. आता भाजपकडे अजित पवारांचा पर्याय आहे त्यांना मुख्यमंत्री केलं जाईल, अशी भविष्यवाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी (Prithviraj Chavan on Ajit Pawar) केली आहे. येत्या १० ऑगस्ट दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या पक्षांतरबद्दल निर्णय होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री हे अजित पवार होतील. त्यांना ती जबाबदारी आगामी लोकसभा निवडणूक पाहता दिली होईल, असेही चव्हाण म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून करण्यात आलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांना भाजपकडून मुख्यमंत्री केलं जाईल, अस सातत्याने बोललं जात आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात एकनाथ शिंदे यांची सुट्टी होणार का? अशीच चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्र्यांकडून वाढलेल्या दिल्ली वाऱ्यांमुळेही चर्चेत अधिकच भर पडत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार करून अजित पवार यांना मुख्यमंत्री केला जाईल, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

निधी वाटपात अजित पवार पुन्हा एकदा रडारवर आले आहेत. याबाबत विचारले असता ते म्हणाले की, शिवसेना आणि राष्ट्रवादीत पक्षांतर झालं, त्यामध्ये काही मोठे आकडे समोर आले. काही रोखेचे विषय झाले. बदली आणि कॉन्ट्रॅक्टचे काम आण अशी आश्वासन निधी वाटपआधी देण्यात आली. पक्षांतर केलेल्या आमदारांना कोटीच्या घरात अगदी दीडशे कोटी रुपये निधी देण्यात आला ही आश्वासन पूर्ती आहे का? पक्षांतर करण्यासाठी आर्थिक प्रलोभने दिली गेली का? राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांना झुकत माप दिला गेलं का? हे आता सांगता येत नाही. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ज्यामध्ये २०२४ लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीकोनातून भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी आकलन केलं आहे, त्यात मुख्यमंत्री अजित पवार होतील. नरेंद्र मोदी यांची कामाची पद्धत वापरा आणि फेकून द्या आहे. अगदी तसाच एकनाथ शिंदे यांचं काम झाल्यावर होईल.

हे ही वाचा:

वन्यप्राण्यांकडून सर्व पिकांची होतेय ‘लूट’

रोहित पवार एकटेच बसले आंदोलनाला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss