Wednesday, October 2, 2024

Latest Posts

कोल्हापुरात संजय मंडलिकांविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन

काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये मोठा बंड झाला. त्यानंतर दोन्ही गटामध्ये खरी शिवसेना कोणती यावरून वाद सुरु झाला. तर आता कथित बनावट प्रतिज्ञापत्र आरोपांवरून कोल्हापूरमध्ये शिवसेनेतील दोन्ही गट पुन्हा आमनेसामने आले आहेत. शिंदे गटातील बंडखोर खासदार संजय मंडलिक यांनी भाडोत्री शब्द वापरल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आज कोल्हापूरमध्ये आंदोलन करत कडक इशारा दिला. शिवसैनिकांचा भाडोत्री असा उल्लेख केल्याचा संताप या आंदोलनात पहायला मिळाला.

कोल्हापूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. शिवसैनिकांना भाडोत्री हा शब्द वापरल्याबद्दल हे आंदोलन करण्यात आले. जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली बिंदू चौकात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसैनिकांनी खासदार मंडलिक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी ठाकरे गटाकडून देण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांची मुंबई गुन्हे शाखेकडून कोल्हापुरात चौकशी सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय मंडलिक यांनी शिवसेनेला भाडोत्री शिवसैनिक आणायची गरज नव्हती असं वक्तव्य केलं होतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मंडलिक यांना खासदार करण्यासाठी आम्ही जीवाचे रान केले आणि याच मंडलिकांनी विश्वासघात केला. कोल्हापूरची स्वाभिमानी जनता २०२४ च्या निवडणुकीत मंडलिक यांना धूळ चारेल. १०० खोके, भाडोत्री संजय मंडलिक ओके ही टॅगलाईन आम्ही घराघरात पोहाचवणार असल्याचे संजय पवार म्हणाले.

संजय मंडलिक यांनी काल प्रतिज्ञापत्रावरून बोलताना टीका केली होती. शिवसैनिकांना अशा पद्धतीने काम करण्याची गरज नाही. जो सच्चा शिवसैनिक आहे तो प्रतिज्ञापत्र देईलच, पण बोगस करण्याची गरज नाही. त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणायचं, पण खऱ्या शिवसेनेचा विचार कोणी सोडला हे लक्षात येत आहे. त्यामुळे भाडोत्री माणसं गोळा करावी लागत आहेत. बनावट प्रतिज्ञापत्र सक्षम अधिकारी चूक की बरोबर ठरवतील.

हे ही वाचा :

नेत्यांनाच खुश करायचं असेल तर बंद खोलीत… – रोहित पवारांचा चंद्रकांत पाटील यांना टोला

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी पुढच्या वर्षी अडकणार लग्नबंधनात, लवकरच करणार तारीख जाहीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss