Thursday, July 4, 2024

Latest Posts

महाविकास आघाडीशी साधली जवळीक; महायुती ने केली कारवाई !

राजकीय नाट्यात बदल होताना दिसत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता काही नवे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यातच आता सत्ताधारी पक्षातील माजी आमदार के. पी. पाटील (K.P. Patil) चेअरमन असलेल्या दूधगंगा वेदगंगा अर्थात बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या...

लोकसभा निवडणूक झाली. केंद्रात सत्ताविस्थापन देखील झाले आहे. ही लोकसभानिवडणूक महाविकास (Mhavikas Aghadi) आघाडी व महायुतीमध्ये (Mahayuti) मध्ये रंगली. अश्यातच आता बरेच मंत्री हे आपापले पक्ष बदल करत आहेत. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेले दिसत आहे. राजकीय नाट्यात बदल होताना दिसत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता काही नवे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यातच आता सत्ताधारी पक्षातील माजी आमदार के. पी. पाटील (K.P. Patil) चेअरमन असलेल्या दूधगंगा वेदगंगा अर्थात बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पाची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणी करण्यात येत आहे. महायुतीत असलेले केपी पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू असतानाच हे तपासणीसत्र सुरु झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

कृष्णराव पाटील हे कोल्हापूरमधील मुदाळ, भुदरगड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. काँग्रेसचे माजी आमदार बजरंग देसाई (Bajrang Desai) यांच्या विरुद्ध राधानगरी मतदारसंघातून अपक्ष म्हणून २००४ मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. के पी पाटलांनी पुढील दहा वर्षे आमदारकी टिकवली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस (Netional Congress) पक्षासोबत असलेले माजी आमदार कृष्णराव पाटील उर्फ के. पी. पाटील हे दूधगंगा वेदगंगा अर्थात बिद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. या डिस्टलरी प्रकल्पाची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणी करण्यात येत आहे. या अजब राजकीय योगायोगाची राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु झाली आहे.

विशेष म्हणजे, सध्या महायुतीत असलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार के पी पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच कारखान्यावर झालेल्या तपासणीमुळे चर्चांना उधाण आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे (State Excise Department) कार्यालयाच्या पथकाने झडती घेतली. शुक्रवारी सायंकाळी अचानक आलेल्या पथकाने रात्रभर तपासणी केली. प्रकल्पात असलेल्या त्रुटींच्या बाबत तपासणी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आलेल्या तपासणी बाबत प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली होती.

के. पी. पाटील यानं एकंदरीत २ वेळा पराभवाचा सामना करण्यात आला आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर राधानगरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना त्यांना दोन्ही वेळा पराभवाचा धक्का बसला. शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांनी पाटलांना पराभूत केले आहे. राजकीय नाट्य काय वेगळी कलाटणी घेईन हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. 

हे ही वाचा

त्वरा करा विद्यार्थ्यांसाठी ‘अच्छे दिन’; शिक्षणासाठी आणली ‘ही’ नवी शिष्यवृत्ती

NEET PAPER LEAK 2024 : नीट पेपर फुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss