spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अमरावतीमध्ये बचू कडूंचा जाहीर मेळावा; मेळावा स्थळी झळकले ‘मै झुकेगा नही’ चे बॅनर

गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे माजी राज्यमंत्री आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू व भाजपशी जवळीक असलेले आमदार रवी राणा यांच्यातील वाद संपुष्टात येण्याची चिन्हं दिसत आहेत. रवी राणा आणि बच्चू कडू यांनी रविवारी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर रविवारी रात्रीपर्यंत वर्षा बंगल्यावर राजकीय खलबतं सुरु होती. जवळपास अडीच तास वर्षा बंगल्यावर बैठक सुरु होती. या बैठकीनंतर बच्चू कडू आणि रवी राणा आपापल्या तलवारी म्यान करतील, असे सांगितले जात होते. या दोन्ही नेत्यांकडून काल पत्रकार परिषद घेऊन आपापली भूमिका स्पष्ट केली. त्याचबरोबर या वादाला विराम दिला. रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतल्याचा आरोप केला होता. तर अमरावतीत (Amravati) आज १ नोव्हेंबर आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेचा मेळावा होणार आहे. आमदार रवी राणा यांच्यासोबत झालेल्या वादाबाबत बच्चू कडू आज त्यांची भुमिका मांडणार आहेत. कडू नेमका काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी मेळावा होणार आहे, त्या ठिकाणी ‘मै झुकेगा नही’ चे पोस्टर झळकले आहेत. त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

रवी राणा (Ravi Rana) यांनी बच्चू कडू यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर रवी राणा यांनी याबबात दिलगिरी व्यक्त करत आपलं वक्तव्य मागे घेतलं होतं. तसेच बच्चू कडू यांनी त्यांच्याबाबत वापरलेले शब्द मागे घ्यावेत असंही रवी राणा यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आज बच्चू कडू नेमकं काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद मिटवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला आमदार रवी राणा गेले होते. परंतू बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेट घेतली नव्हती.

रवी राणांनी आरोप केल्यानंतर बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. रवी राणांना या आरोपाबाबत पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले होते. याबाबत रवी राणांना एक नोव्हेंबरचा अल्टीमेटम दिला होता. तो अल्टीमेटम आज संपत आहे. अद्याप रवी राणांनी याबाबत कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. त्यांनी दिलगिरी व्यक्त करत आपले शब्द मागे घेतले आहेत. त्यानंतर आज बच्चू कडू त्यांची भूमिका मांडणार आहेत. एक नोव्हेंबरपर्यंत माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे सादर केले नाहीत तर आपण कोर्टात धाव घेणार असल्याचंही आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं होतं.

हे ही वाचा :

राशी भविष्य -१ नोव्हेंबर- बऱ्याच काळापासून अडकून पडलेली कामे…

हाडांना मजबूत करण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss