पार्ट्यांमध्ये दारू पितानाचे फोटो जाहीर करणार; निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंना धमकी

पार्ट्यांमध्ये दारू पितानाचे फोटो जाहीर करणार; निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंना धमकी

काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहे. बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते आणि महारष्ट्राचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे एका अधिकार्याला दारू पिणार का असा प्रश्न विचारला होता. त्यावरून विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्यावर सडकून टीका केली. त्यावर शिवसेनेचे नेते आणि युवा सेने प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हणटं आहे की “आदित्य ठाकरे चे पार्ट्यांमध्ये दारू पितानाचे फोटो जाहीर करणार – श्री पावसकर, आदित्य एरबस कंपनी विसरला आणि कल्टी…” त्यामुळे आता राजकीय वाद पेटण्याची चिन्हं आहेत.

ठाकरे आणि राणे वाद जगजाहीर आहे. भाजपचे नेते निलेश राणे यांनी गेल्या काही दिवसांन आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. उद्धव ठाकरेंची अवस्था ही पिसाळलेल्या कुत्र्यासारखी झालीय, पिसाळलेल्या कुत्र्याचं काय करायचं, हे मला वेगळं सांगायची गरज नाही, अशा शब्दांत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे मोठा वाद निर्णान झाला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे ( Minister Narayan Rane, Ex MP Nilesh Rane and MLA Nitesh Rane) यांचा उपहासात्मक उल्लेख करुन सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्याविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता मात्र निलेश राणे यांनी ट्विट करत थेट आदित्य ठाकरेंना धमकी दिली आहे.

निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हणटं आहे की “आदित्य ठाकरे चे पार्ट्यांमध्ये दारू पितानाचे फोटो जाहीर करणार – श्री पावसकर, आदित्य एरबस कंपनी विसरला आणि कल्टी…” त्यामुळे आता राजकीय वाद पेटण्याची चिन्हं आहेत. राणे- ठाकरे वाद दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. त्यामुळं जर फोटो जाहीर केले तर आदित्य ठाकरे आडचणीत येवू शकतात.

हे ही वाचा :

राज्यात कापूस पिकाचे दुहेरी नुकसान, पिकांवरील किडींचा प्रादुर्भाव भाव मिळेना

PM Modi : ‘जहां झुग्गी वही मकान’ या योजनेअंतर्गत, दिल्लीतील ५०० झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version