पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणूक जाहीर, २७ फेब्रुवारीला होणार मतदान

पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणूक जाहीर, २७ फेब्रुवारीला होणार मतदान

महाराष्ट्रात दोन पोटनिवडणुकांच्या (Two by-elections in Maharashtra) निवडणुका जाहीर झाल्या आहेत. कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवड (Chinchwad) मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप (MLA Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीची अधिसूचना ३१ जानेवारी रोजी जारी करण्यात येणार असून ७ फेब्रुवारी ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. ८ फेब्रुवारीला अर्जांची छाननी होणार असून १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. या दोन्ही पोटनिवडणुकांसाठी २७ फेब्रुवारीला मतदान होणार असून २ मार्चला निकाल जाहीर होणार आहेत.

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या या दोन्ही जागा रिक्त झाल्या. या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. दरम्यान, दोन्ही जागांवर महाविकास आघाडी भाजपविरोधात उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. तसेच दोन्ही जागांवर भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.

पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे २२ डिसेंबर रोजी निधन झालं. भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजारामुळे ३ जानेवारी रोजी निधन झाले. दरम्यान आता भाजप विरोधात दोन्ही जागांवर महाविकास आघाडी उमेदवार देण्याची शक्यता आहे. तसेच दोन्ही जागेवर आता भाजपकडून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे आता लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

Ukrain Russia War कीवमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात, युक्रेनच्या गृहमंत्र्यांसह १८ जणांचा मृत्यू

मुंबईच्या सभेत महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्यांवर पंतप्रधान मोदींनी बोलावे!, नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version