spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Exclusive, कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या खळबळजनक निकालावर, जेष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे आणि अभिजित ब्रम्हनातकर म्हणाले…

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पिंपरी चिंचवड आणि कसबा या मतदार संघांमधल्या पोट निवडणुकीचे निकाल हे भाजप आणि महा विकास आघाडी ह्या दोन्ही पक्षांना डोके दुखीचे ठरणार का?

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पिंपरी चिंचवड आणि कसबा या मतदार संघांमधल्या पोट निवडणुकीचे निकाल हे भाजप आणि महा विकास आघाडी ह्या दोन्ही पक्षांना डोके दुखीचे ठरणार का? हाच काळीचा प्रश्न सर्वां समोर आहे. ह्या दोनही ठिकाणी चांगलीच चुरशीची लढाई बघायला मिळाली. त्यात कसबा मतदार संघात धंगेकर यांचा तर पिंपरी चिंचवड येथे अश्विनी जगताप ह्यांचा विजय होताना आपल्याला दिसून येत आहे .ह्याच पार्श्वभूमीवर टाइम महाराष्ट्र ने जेष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक शैलेंद्र परांजपे अभिजित ब्रम्हनातकर ह्यांची मुलाखत घेतली . त्यांचा निवडणुकीच्या सर्वेक्षणाचा गाढ अभ्यास देखील आहे.

त्यांनी गिरीश बापटांच्या मुद्यावर बोलताना सांगितले कि गिरीश बापटांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे ते गेले दोन ते तीन महिने बेड रिडन आहेत,आणि ते फक्त एकदा प्रचाराला आले आणि त्यांनी मतदान देखील केले. कसबा हा भाजपचा नाही तर गिरीश बापटांचा बाले किल्ला आहे. पहिल्या वेळेस हरल्या नंतर ते सलग पाच वेळेस निवडून आले आणि नंतर ते लोकसभेचे खासदार झाले. ते खासदार झाल्यानंतर मुक्ता टिळक ह्या निवडून आल्या आता त्यांच्या निधनानंतर हि पोट निवडणूक घेण्यात आली.आठवीस वर्ष हा बाले किल्ला भाजपाकडे होता आता तो हिसकावून घेण्यात काँग्रेस ला यश आले आहे. हे महाविकास आघाडी एकत्र आहे म्हणून शक्य झाले . जर हा भाजपचा बाले किल्ला असता तर त्यांना तो राखण्यासाठी त्यांना इतके कष्ट घ्यावे लागले नसते.

टिळकांच्या घरात तिकीट न दिल्याबद्दल त्यांनी सांगितले कि भाजपने देखील जस गोपीनाथ मुंडेंनंतर त्यांचा कन्येला तिकीट दिल ,आर आर पाटलांच्या पत्नी देखील आमदार आहेत परंतु मुक्ता टिळक ह्यांचे पती किंवा चिरंजीव हे कधीही राजकारणात सक्रिय होते असं दिसून आल नाही,आत मुक्ता टिळकानाच्या निधनानंतर तिकीट देऊन सिम्पथी मिळेल , तर तशा प्रकारचा सिम्पती देणारा तो मतदार संघ वाटत नाही.किंवा गिरीश बापटांच्या सुनेला तिकीट द्यावं अशा चर्चाना काही अर्थ नसतो. भाजपचे लोक ज्यावेळेस तिकीट देतात तेव्हा ह्या गोष्टींचा विचार करून देतात आणि आजकालच्या राजकारनातं जिंकून येण्यासाठी क्षमता महत्वाची आहे. आज फडणवीसांनी देखील अशी प्रतिक्रिया दिली कि तिकीट हे स्थानिक पातळीवरच्या लोकांच्या मतावरून दिला गेल होत,त्यामुळे उमेदवार निवडीचा मुद्दा त्यांनी खालच्या स्तरावर ढकाला आहे परंतु मुद्दा असा आहे कि टिळकांच्या घरात तिकीट न देण्यात कोणताही राजकारण नाही.

अभिजित ब्रम्हनातकर ह्याच मुद्यावर म्हणाले कि ह्या निवडणुकीत भाजपाची रणनीती चुकली, त्यांनी ज्या सर्वेक्षणाचा विचार करून हेमंत रासनेना तिकीट दिल ते त्यांना तिकीट दिल्या नंतर चुकीचा वाटलं,हेमंत रसाने हे पुणे महानगरपालिकेत स्थायी समतेचे अध्यक्ष होते पण त्यांनी तिथे काम न केल्याचा फटका त्याला मिळाला. भाजपने गिरीश बापटांचा देकील सल्ला घ्यायला हवा होता . त्यासोबतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे अमित शहांच्या दौऱ्या नंतर प्रचारात उतरले तोवर हि जागा भाजपच्या हातातून गेली होती.

शैलेन्द्र जी म्हणाले कि पुण्याबाहेरचे लोक सर्व पेठांना एक समजतात पण तास नाहीये कसाब मतदार संघात दोन भाग येतात त्यातील पश्चिम भागातील लोक हे भाजप कडे झुकलेले आहे ,आणि पूर्वेकडील भाग थोडासा काँग्रेसचा प्रभाव आहे . ते मतदार अतिशय हुशार आहे . आता पर्यंत कोणालाहि वाटले नाही कि पोटनिवडणुकीच्या परिणाम देशाच्या राजकारणावर होणार नाही,परंतु कसबा निवडणुकी चा परिणाम होऊ शकतो. असं धाडसी विधान देखील त्यांनी केल आहे. अभिजित जी म्हणाले कि कसब्याने ह्या सरकारला आरसा दाखवला आहे ,ह्या पराभवाचा विचार त्यांनी केला तर त्यांना कळेल .

शैलेंद्रजी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या ४० आमदारांबद्दल बोलताना म्हणाले कि हे आधी युद्ध ठाकरे यांच्या सोबत होते त्यांनी ह्यातील किमान १५ लोकांचे तरी तिकीट कापले असते. पण आता ते भाजप सोबत असल्यामुळे ते विद्यमान आमदार असल्याने त्यांना तिकीट नक्कीच मिळेल . कसब्याच्या निकालावर हे नाकी काळात कि महाविकास आघाडी एकत्र राहिले तर ते नकीच शिंदे गटाला हरवू शकतील. जागा वाटप सुद्धा कळीचा मुद्दा आहे आणि आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत शिवसेना सुद्धा आहे त्यामुळे कोणाला कोणती जगामिळते हे जर तर चे प्रश्न आहेत. नंतर भाजप आणि शिंदे गट अनेक ठिकाणी प्रभावी आहेत. कसब्याने धोक्याचा इशारा भाजप दिला आहे ,कसब्याच्या निकाला नंतर आता देवेंद्र फडणवीस अधिक सक्रिय होतील. आणि ह्या निवडणुकीचा विचार करून पुढे भाजप काय पॉल उचलते त्यावर पुढचे निकाल अवलंबून आहे

हे ही वाचा :

Pune By-Poll Results 2023 LIVE Updates, पुण्यातील जनतेचा कौल कुणाला? जाणून घ्या प्रत्येक अपडेट

अश्विनी जगताप ह्यांची आघाडी कायम , नाना काटे टक्कर देऊ शकतील का ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss