Thursday, July 4, 2024

Latest Posts

उडता पंजाब सारखं उडता पुणे तयार झाले आहे: Ravindra Dhangekar

पुणे कार अपघातावरून (Pune Car Accident) रोज नवनवीन खुलासे होत असून राज्यातील राजकीय वातावरण यावरून चांगलेच तापले आहे. आमदार रवींद्र धंगेकर (Ravidndra Dhangekar) हे या प्रकरणावरून चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी राज्य सरकारला (Maharashtra Government) धारेवर धरले आहे.

पुणे कार अपघातावरून (Pune Car Accident) रोज नवनवीन खुलासे होत असून राज्यातील राजकीय वातावरण यावरून चांगलेच तापले आहे. एका धनिक बिल्डरपुत्राला वाचवण्यासाठी यंत्रणा आणि कायद्याचे कश्याप्रकारे उल्लंघन केले जातेय याची प्रचिती आता सगळ्यांचा येत आहे. अश्यातच, सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. काँग्रेसचे (Congress) पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravidndra Dhangekar) हे या प्रकरणावरून चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी राज्य सरकारला (Maharashtra Government) धारेवर धरले आहे.

अश्यातच रवींद्र धंगेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधत या प्रकरणावरून भाष्य केले. तसेच, पुणे पोलिसांवर (Pune Police) गंभीर आरोप करत ‘उडता पंजाब सारखं उडत पुणे अशी संस्कृती पुण्यात तयार झाली आहे,” अशी टिपण्णीही त्यांनी केली आहे.

यावेळी ते म्हणाले, “पुण्यात अनेक तरुण, नोकरवर्ग येतोय. पुण्यात पब संस्कृती आली आहे. उडता पंजाब सारखं उडत पुणे अशी संस्कृती पुण्यात तयार झाली आहे. पोलिसांनी पैसे खाऊन दोन दोन FIR लिहिल्या आहेत. एका FIR मधून त्यांना सोडून देण्यात आलं आहे. तपास अधिकारी यांनी तपासाची दिशा योग्य पद्धतीने नेली आहे, मात्र सरकारचा दबाव येऊ शकतो. ससूनवर जे आरोप केले त्यामुळे मुश्रीफ यांना राग आला आहे. मी त्यांचे पाया पडून माफी मागतो मात्र पब संस्कृती संपली पाहिजे.”

पुढे ते म्हणाले, “शाहू, फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात कामं करताना मला कोणाचीही भीती वाटतं नाही. मला कोणीही घाबरवण्याचा प्रयत्न केला तर मी घाबरणार नाही. माझ्यावर कारवाई केली तर प्रत्येक पुणेकर रस्त्यावर येईल. भाजप मला वैयक्तिक जीवनात त्रास देत आहेत. मुश्रीफ कसं वागतात ते त्यांनाच माहित… तावरे हा चुकीचं कामं करतात हे त्यांना माहिती आहे. प्रशासन तावरेंच्या पाठीमागे होते. डीन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे यात सुद्धा शंका आहे. अजय तावरेला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न आहे असं वाटतं. माझ्यावर हक्क भंग करणाऱ्याच्या मतदार संघात जाऊन मी तिथे स्पष्टीकरण द्यायला तयार आहे. हसन मुश्रीफ यांची ही चूक आहे. तावरेना चौकात आणून फाशी दिली पाहिजे. मी माफी मागणारा कार्यकर्ता नाही आहे. पुण्यात बिल्डर लोकांचं राज सुरू आहे. पोलीस सुपाऱ्या घेऊन कामं करतात.”

हे ही वाचा:

Megablock चा मुंबईकरांना फटका, वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल

मुंबईकरांनो सावधान ! ६३ तासांचा ‘जंबोब्लॉक’..जाणुन घ्या संपूर्ण वेळापत्रक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss