spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुण्यातील धक्कादायक घटनेबाबत चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, अघोरी आणि भयंकर प्रकार…

आज पुण्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली आहे. यावर आज पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

आज पुण्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली आहे. यावर आज पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आज मुंबईत विधिमंडळाबाहेर चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले त्या वेळी बोलत असताना पुण्यातील घडलेल्या या किळसवाण्य़ा प्रकारासंदर्भात सगळीकडून प्रतिक्रिया येत आहे आणि अनेकांकडून या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले आहेत की, विज्ञानाच्या युगात जादुटोण्यासाठी (Pune crime) सुनेचं मासिक पाळीचं रक्त विकणं हा अघोरी आणि भयंकर प्रकार आहे.

आज माध्यमांशी बोलत असताना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “पुण्यात सासरच्या लोकांनी एका महिलेला मासिक पाळीच्या वेळी हातपाय बांधून अत्यंत विचित्र प्रकार केला. ते सार्वजनिकपणे बोलावंही वाटत नाही. विज्ञान युग असताना समाजात भयंकर अंधश्रद्धा वाढत चालली आहे. अंधश्रद्धेमुळे समाजात अशा भयानक गोष्टी घडत आहेत. या प्रकरणी मी पुणे पोलीस आयुक्तांशी बोललो. त्यानंतर ही घटना पुणे ग्रामीणमधील असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांशी बोललो. आरोपींविरोधात जेवढी कडक कलमं लावता येतील तेवढी कडक कलमं लावा, असा आदेश दिला आहे.असा आघोरी प्रकार करत असताना भीती का वाटत नाही किंवा कायद्याची तरी भीती वाटली पाहिजे.”

नेमके प्रकरण काय ?

सासरच्या मंडळींनी महिलेच्या मासिक पाळीचे रक्त विकत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मासिक पाळी सुरू असताना महिलेचा छळ करून अघोरी कृत्य केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी पतीसह सात जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तिचा पती सागर ढवळे, सासू अनिता ढवळे, सासरे बाबासाहेब ढवळे, दीर दीपक ढवळे, मावस दीर विशाल तुपे, भाचा रोहन मिसाळ, म्हाधू कथले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तींवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा जादूटोणा प्रती अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील सर्वात धक्कादायक बाबा म्हणजे हा प्रकार २०१९ पासून सुरु होता. तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि पीडित महिला पुण्यातील विश्रांतवाडी भागात राहायला असून तिचे वय हे २७ वर्ष आहे. २ वर्षांपूर्वी तिने प्रेम विवाह हा केला होता. परंतु नंतर सासऱ्या मंडळींनी तिचा मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. अघोरी विद्येच्या नादात सासरच्या मंडळींनी पीडित महिलेच्या मासिक पाळी दरम्यान तिचे हातपाय बांधून तिचे मासिक पाळीचे रक्त कापसाने काढून ते बाटलीत भरुन ५० हजार रुपयांना जादूटोण्यासाठी विकल्याचा धक्कादायक प्रकार घडला. घडलेली घटना या पीडित महिलेने तिच्या आई वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली.

हे ही वाचा :

मुश्रीफांच्या आरोपांनंतर उच्च न्यायालयाचा सोमय्यांना झटका!, दिले चौकशीचे निर्देश

पुण्यात जादूटोणा प्रकरणाचा कहर! सुनेच्या मासिक पाळीचं रक्त विकलं

विरोधी पक्षनेते अजित पवार जातीच्या राजकारणावरुन सभागृहात आक्रमक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss