Saturday, July 6, 2024

Latest Posts

Pune Drugs Case: विरोधकांनी राजकारण करु नये, नाहीतर अडीच वर्षातील प्रत्येक गोष्ट सांगेल: Devendra Fadnavis

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुणे ड्रग्स प्रकरणावरून आरोप करणाऱ्या विरोधकांवर टोला लगावत, "ड्रग्ज प्रकरणावर राज्य सरकार योग्य ती कारवाई करत असून विरोधकांनी याचे राजकारण करू नये, " असे वक्तव्य केले आहे.

पुणे ड्रग्स प्रकरणावरून (Pune Drugs Case) राज्यातील वातावरण आता चांगलेच तापले आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात हॉटेल्समध्ये ड्रग्सचे सेवन करणारया मुलांचे व्हिडीओ वायरल झाल्यानंतर एकाच खळबळ उडाली. यावरून राजकीय नेत्यांनी एकमेकांवरून आरॊप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या. अश्यातच, आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणावरून आरोप करणाऱ्या विरोधकांवर टोला लगावत, “ड्रग्ज प्रकरणावर राज्य सरकार योग्य ती कारवाई करत असून विरोधकांनी याचे राजकारण करू नये, ” असे वक्तव्य केले आहे. तसेच, ‘राजकारण करायचे असेल तर अडीच वर्षाच्या काळातील प्रत्येक गोष्ट मला सांगावी लागेल,’ असा सूचक इशाराही त्यांनी विरोधकांना दिला आहे.

याबाबत सविस्तर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आधीच्या सरकारच्या काळामध्ये पोलीस विभागाचे कसे धिंडवडे निघाले आणि शंभर-शंभर कोटी रुपयांची वसुली कशी झाली हे आपण सर्वांनी बघितले आहे. आज केंद्र सरकारची मदत मिळते आहे. राज्य सरकार एकत्र काम करते आहे म्हणून या ठिकाणी सर्व बाहेर येत आहे. ड्रग्ज प्रकरणावर राज्य सरकार योग्य ती कारवाई करत आहे. मला असे वाटते विरोधकांनी याचा राजकारण करू नये आणि राजकारण करायचे असेल तर अडीच वर्षाच्या काळातील प्रत्येक गोष्ट मला सांगावी लागेल,” असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.

काल (मंगळवार, २५ जून) रात्री झालेल्या आढावा बैठकीबाबत भाष्य करत ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात दोन बैठका झाल्या आहेत. एक स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक होती तर दुसरी खरीप पूर्वक हंगाम बैठक होती. या दोन्ही बैठकांमध्यो सविस्तर चर्चा झाली आहे. सी बिलच कारण देऊन शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर कारवाई करणार. शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न या बैठकीत केला आहे. शेतकऱ्यांना पिक विमा पूर्ण मिळाला पाहिजे याचा संपूर्ण आढवा या बैठकीत घेतला आहे. तसेच, लिंकेज संदर्भात आदेश दिले आहेत, केवळ कृषी सेवा केंद्रावर नव्हे तर ज्या कंपन्यांच्या प्रॉडक्टच लिंकेज होत आहे त्या कंपन्यांवरही कारवाईचे आदेश दिले आहेत.” असे ते म्हणाले.

हे ही वाचा

VIDHAN PARISHAD ELECTION 2024: कोण ठरणार मुंबई शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ?

VIDHAN PARISHAD ELECTION: मुंबई पदवीधर मतदारसंघ कोणाच्या ताब्यात येणार ? ; जाणूयात सविस्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss