spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर मराठी मातीतील माणूस बसवा; संजय गायकवाड

आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरून नेहेमी चर्चेत राहणारे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील नायक झाले असल्याचे सांगत नवा वाद निर्माण केला आहे. शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली. “या राज्यपालांना कुठे नेऊन घालायचं तिकडे घाला, पण महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर मराठी मातीतील माणूस बसवा,” अशी मागणी केली.

सकाळी माध्यमांशी बोलतांना संजय गायकवाड म्हणाले, “भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा महाराष्ट्र घडवला त्यांचा राज्यपालांनी तीन ते चारवेळा एकेरी उल्लेख केला. छत्रपतींना शिवाजी म्हणतात आणि शिवाजी जुने झाले असंही सांगतात. या राज्यपालांना कळालं पाहिजे की, शिवविचार कधी जुना होत नाही. तसेच त्यांची तुलना जगातील कोणत्याही महापुरुषाशी करता येत नाही.”

यंदाच्या लग्नसराईत वाजणार ‘टीडीएम’ चित्रपटातील ‘बकुळा’ गाणे

“माझी भाजपाच्या सर्व केंद्रीय नेत्यांना विनंती आहे की, ज्या राज्यपालांना महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही, राज्य काय आहे हे ज्याला कळत नाही, अशा माणसाला आपल्या राज्याच्या राज्यपालपदावर ठेऊन उपयोग नाही. राज्यपालपदावर या मराठी मातीतील माणूसच ठेवावा,” अशी मागणी संजय गायकवाडांनी केली. “या राज्यपालांना कुठे नेऊन घालायचं तिकडे घाला,” असं म्हणत गायकवाडांनी भगतसिंग कोश्यारींवर खोचक वक्तव्य केलं.

शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखात सुद्धा आज राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्रात पोहोचलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेतील एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी सावरकरांच्या दया याचिकेची कागदपत्रे दाखवून वादळ ओढवून घेतले तेव्हा महाराष्ट्रातील भाजप व त्यांच्या सोबतचा मिंधे गट स्वाभिमान, अपमान वगैरेंच्या नावाने वळवळू लागला, त्यातले काही वळू रस्त्यावर उतरले. त्यांनी ‘‘शिवसेना आता काय करणार?’’ असे विचारून राहुल गांधी यांना जोडे मारण्याचा उपक्रम सुरू केला. आता हे सर्व जोडे स्वत:च्याच हाताने स्वत:च्याच कानाखाली मारण्याची वेळ या जोडेबाजांवर आली असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

हे ही वाचा : 

सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप; संघाच्या शाखेतचं चुकीचा इतिहास शिकवला जातोय

Navale Bridge Accident : ब्रेक फेल नव्हे, तर ‘या’ कारणामुळे घडला नवले ब्रिजवर अपघात

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Latest Posts

Don't Miss