spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राजवस्त्रे बाजूला काढा आणि या, मग दाखवतो, राऊतांचा राणेंना इशारा

संजय राऊत यांनी राणेंना प्रतिउत्तर देत राणे आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. राणेंची सर्व आर्थिक प्रकरण बाहेर काढली, तर ५० वर्ष सुट्णारत नाहीत, असा जोरदार हल्लाबोल देखील राऊतांनी केला.

महाराष्ट्रातील राजकारणात राजकीय नेते रोज एकमेकांवर टीका करताना दिसतात आणि त्यातूनच एका नव्या वादाला सुरुवात होते. तसेच आज देखील झालं. आज सकाळी भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लवकर जेलवारी घडवणार असल्याच विधान केलं होत. त्यावर संजय राऊत यांनी राणेंना प्रतिउत्तर देत राणे आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. राणेंची सर्व आर्थिक प्रकरण बाहेर काढली, तर ५० वर्ष सुट्णारत नाहीत, असा जोरदार हल्लाबोल देखील राऊतांनी केला.

राणे हे कणकवलीमध्ये होते. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं कि,”संजय राऊतांना लवकरच जेलवारी घडवणार.” यावर प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले,”उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आम्ही अग्रलेख लिहिला आहे. त्यांच्याविषयी आम्हाला आदर आहेच. देशभरातून लोक मुंबईमध्ये पोट भरण्यासाठी येतात. मुंबई देशाचं पोट भरते. आम्ही त्यांना प्रेमाने सांभाळतो. मात्र आम्ही कधी नारायण राणे यांच्यावर अग्रलेख लिहिला नाही. ते म्हणत असतील आम्ही कारागृहात जाणार, तर त्यांनी आमचा कारागृहात जाण्याचा मार्ग मोकळा करावा. त्याच्या सारखे आम्ही डरपोक नाही. पळपुटे-भित्रे नाही. ईडीची नोटीस येताच पक्ष बदलणारे आम्ही नाही,” अशी टीका संजय राऊत यांनी राणे आणि त्याचबरोबर शिंदे गटावर केली.

यापुढे बोलताना राऊत म्हणाले,”हिमतीच्या, धाडसाचा गोष्टी ते बोलतात, त्यांनी बोलाव्या. मी अजुनपर्यंत राणेंविषयी काही बोललो नाही. मात्र त्यांनी धमक्या देऊ नये. धमक्या द्यायच्या असतील राजवस्त्र बाजूला काढा, आणि या मग दाखवतो मी. माझ्या नादाला लागू नका, झाकली मूठ सव्वालाखाची”,असं म्हणत त्यांनी नारायण राणे यांना इशारा दिला आहे.

पुढे,”हे काय मला जेलमध्ये टाकतात. मी हिंमतीने जेलमध्ये गेलो. तुमच्यासारखी शरणागती नाही पत्करली. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. घाला मला जेलमध्ये”,असं आव्हान देखील राऊत यांनी दिलं. तसेच, “राणेंची सर्व आर्थिक प्रकरणे बाहेर काढली, तर ५० वर्ष सुटणार नाहीत”, अशी टीका देखील राऊतांनी केली.

हे ही वाचा:

Uorfi Javed – Chitra Wagh यांच्या वादात आता अंजली दमानियांची एंट्री

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात बॅनरबाजी, मॉर्डन अफजलखानाचे करायचे काय?

अर्चना नेवरेकर फाउंडेशनचा ‘कलादर्पण’ पुरस्कार सोहळा जल्लोषात पार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss