प्रकल्प महाराष्ट्रातला मग नोकरीची संधी चेन्नईत का? मनसैनिकाचा सवाल

प्रकल्प महाराष्ट्रातला मग नोकरीची संधी चेन्नईत का? मनसैनिकाचा सवाल

वेदान्त-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क प्रकल्पासारखे मोठे प्रकल्प परराज्यात गेल्याची माहिती समोर आणल्यानंतर आता आणखी एक धक्का दायक बातमी समोर येत आहे. मुंबईतील वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पाच्या नोकर भरतीसाठीच्या मुलाखती चेन्नईमध्ये होणार असल्याची सांगितले जात आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष अधिकारी नितीन सरदेसाई यांनी ट्विट केले आहे. “प्रकल्प मुंबईमध्ये आणि नोकरीची जाहीरात चेन्नई मध्ये? हे सहन केलं जाणार नाही. प्रकल्प मुंबईत तर रोजगारावर अधिकारही मुंबईकरांचा.” असे त्यांनी आपल्या ट्विट मधून म्हटले आहे.

हेही वाचा : 

Narayan Rane : उद्धव ठाकरेंनी पक्ष वाढीसाठी कधी प्रयत्न केला ? राणेंचा सवाल

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील वर्सोवा-वांद्रे सी लिंक हे काम अनेक दिवसांपासून बंद असल्याने या कामाचे कंत्राटदार बदलण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्यात प्रत्येक ठिकाणाहून नोकरीसाठी लोक येतात. पण, वर्सोवा वांद्रे सी लिंकची कंपनी बदलल्यानंतर दुसऱ्या कंपनीकडे याचे काम देण्यात आले. या नवीन कंपनीने नोकरीसाठी जाहिरात काढली आहे. मात्र, याच्या मुखाखती चेन्नईत होत आहेत. हा प्रकल्प राज्यात होणार आहे. मग महाराष्ट्रात मुलांना नोकरीची संधी का दिली जात नाही असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केलं जात आहे.

राज ठाकरेंचा विदर्भ दौरा

आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल आणि परवा….बोटं तोंडात घालाल. आम्ही ‘धन’से कमी आहोत, पण ‘मनसे’ लई आहोत. आदर देतोय, आदर घ्या, असे ट्विट राजू पाटील यांनी केले आहे. तसेच याला ‘मौका सभी को मिलता है’, असा हॅशटॅगही राजू पाटील यांनी दिला आहे.

‘या’ ग्राहकांसाठी फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल २०२२ असणार लाईव्ह

दरम्यान, राज ठाकरे सध्या पक्ष बांधणीसाठी विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. याबाबत राज ठाकरेंचा चंद्रपूर दौरा आणि चित्ते भारतात येणे यावर एक प्रश्न शरद पवार यांना विचारला होता. त्यावर शरद पवार यांनी मी लोकांच्या प्रश्नांवर लक्ष देतो. या असल्या गोष्टीत फारसे बघत नाही, असे म्हणून एकूणच राज ठाकरेंच्या दौऱ्याची आणि पंतप्रधान मोदींच्या हस्ते भारतात आणण्यात आलेल्या चित्त्यांच्या कार्यक्रमावर टीका केली.

Liger OTT Release : जाणून घ्या…ओटीटीवर नक्की कधी पाहू शकणार ‘लायगर’

Exit mobile version