“सामना” च्या आजच्या अग्रलेखातून शरद पवार यांना सवाल

“सामना” च्या आजच्या अग्रलेखातून शरद पवार यांना सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी मोठे पाऊल उचलत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाचे कार्याध्यक्ष केले. काँग्रेस पक्षाच्या २५ व्या स्थापना दिनाच्या समारंभात दिल्लीत पवारांसहित अनेकांना बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती. त्याचबरोबर शरद पवार यांनि यावेळेस देखील संधीचा फायदा घेत मोठी घोषणा केली. शरद पवार यांनी काही महिन्याभरापूर्वी अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार अशी घोषणा केली होती. मात्र आता पुन्हा शरद पवार यांच्या कडून पुन्हा मोठी घोषणा केली जाणार आहे.राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मोठे फेरबदल केले आहेत. मात्र आता सामना या दैनिकातून शरद पवारांना सवाल करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी मोठे पाऊल उचलत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाचे कार्याध्यक्ष केले. पवारांच्या या घोषणेने अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. फक्त सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांनाच कार्याध्यक्ष का करण्यात आले हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पवारांच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’तून पवारांच्या या निर्णयावर सवाल करण्यात आला आहे. एकाच वेळी दोन कार्यकारी अध्यक्ष का नेमले? असा सवालच आजच्या दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून करण्यात आला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कारण महाविकास आघाडीचे सरकार असताना देखील सामन्यातील अग्रेलेखातून असा सवाल कसा काय केला जात आहे असा सवाल अनेकांना पडला असल्यामुळे , नवीन चर्चाना उधाण आले आणि आणि काही बड्या नेत्याच्या भुवया देखील उंचावल्या आहेत.

शरद पवार यांनी पक्षात बदल केले आहेत. मात्र पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल या दघनची नियुक्ती सारख्याच पदांसाठी केली आहे.काही जणांच्या मते शरद पवार यांनी भाकरी फिरवली आहे. पण त्यात काही दम वाटत नाही, असं दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून म्हटलं आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचं देशात कुठे कुठे अस्तित्व आहे याची उजळणीही करण्यता आली आहे. राष्ट्रवादीने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला आहे. राष्ट्रवादीचे नागालँडमध्ये चारपाच आमदार आहे. लक्षद्वीपमध्ये एक खासदार आहे. केरळमध्ये एक दोन आमदार आहेत. बाकी सर्व कारभार महाराष्ट्रात आहे. मग एकाच वेळी दोन कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची गरज का पडली? असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे. मात्र घराणेशाही चा आरोप मागे लागू नये म्हणून देखील शरद पावर यांनी प्रफुल्ल पटेल याना देखी सारखेच पद दिले असावे अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या जात आहे. तसेच देशाचा आकार पाहता एकाच नेत्याला सर्वच भागात पोहोचणे कठीण असल्याने दोन कार्यकारी अध्यक्ष नेमल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा मोठे पक्ष देशाच्या राजकारणात आहेत. त्यांनाही देश मोठा असल्याने दोन कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची गरज पडली नाही. पण पवारांनी ते केलं, असं सांगत पवारांच्या मुद्द्याला खोदून काढण्याचा प्रयत्न या अग्रलेखातून केला गेला आहे.

हे ही वाचा:

नाना पाटोले यांनी शिंदे फडणवीस सरकारवर चढवला हल्लबोल

शिंदे गट आणि भाजपमध्ये खटके उडण्यास सुरवात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version