राहुल गांधी आणि रावणात बरच साम्य आहे; अनिल बोंडे

राहुल गांधी आणि रावणात बरच साम्य आहे; अनिल बोंडे

सध्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोघे आपसात भिडले आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी आणि राम यातील ‘रा’ हा शब्द सारखा असल्याचे म्हटले होते. त्यामुळे रामाने दिलेल्या मानवतेवर राहुल गांधी सध्या काम करत आहेत, असे पटोले यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते अनिल बोंडे यांनी तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. राहुल गांधी आणि रावणात बरच साम्य आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रा करताना उत्तरेकडून दक्षिणेकडे न जाता दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहेत.प्रभू श्रीरामाने उत्तरेकडून दक्षिणेकडे यात्रा केली होती. विशेष म्हणजे भारत जोडो यात्रेत राहुल गांधी हे ज्या लोकांनी भारत तोडण्याची शपथ घेतली होती, त्यांच्या गळ्यात गळे घालत आहेत, असे अनिल बोंडे यांनी म्हटले.

अनिल बंडे यांच्या टीकेला काँग्रेस कडून चोक प्रतिउत्तर उत्तर दिलं गेलं. काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी अनिल बोंडे यांच्या वक्तव्यावर जोरदार हल्ला चढवला. अनिल बोंडे भाजपमध्ये येण्यापूर्वी दिवसा-ढारु ढोसत होते. आता भाजपमध्ये आल्यावर दुपारीही ढोसत आहेत. त्यांची वक्तवंय याच गोष्टीची निदर्शक आहेत. कशाची तुलना कुठे करायची हे भान त्यांना राहिलेलं नाही. रा पासून रावण होत असेल तर नरेंद्र मोदी यांच्य ‘न’ पासून नराधम होते. अमित शाहा यांच्या ‘अ’ पासून अमानुष पण होते. अनिल बोंडे यांनी यालाही मान्यता द्यायला पाहिजे. भारत जोडो यात्रे मुळे भाजपची तंतरली आहे. म्हणून त्यांची पातळी सुटली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी केली.

६ नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होणारी भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना काँग्रेसने निमंत्रित केले आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले आहे. या यात्रेला उद्धव ठाकरे किंवा त्यांचे पुत्र माजी मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे पुढील महिन्यात यात्रेचे स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.

हे ही वाचा :

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी – देवेंद्र फडणवीस

भाजपच्या दीपमोहत्सवात मराठी कलाकारांची चेष्टा – सचिन अहिर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version