संसदेत राहुल गांधींनी केला सवाल, गौतम अदानी आणि नरेंद्र मोदींचं काय नातं?

सध्या देशात गौतम अदानी यांच्या प्रकरणाची चर्चा ही जोरदार सुरू आहे. यावरुन विरोधक भाजप सरकारवर टीका करत आहेत. अनेक आंदोलने देखील झाली.

संसदेत राहुल गांधींनी केला सवाल, गौतम अदानी आणि नरेंद्र मोदींचं काय नातं?

सध्या देशात गौतम अदानी यांच्या प्रकरणाची चर्चा ही जोरदार सुरू आहे. यावरुन विरोधक भाजप सरकारवर टीका करत आहेत. अनेक आंदोलने देखील झाली. तर आज संसद देखील या मुद्यावरून चांगलंच गाजलेले आहे. कारण आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत भाजप सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. अनेक साहिल उपथित करून जोरदार फटकेबाजी केली आहे.

संसदेत बोलत असताना राहुल गांधी म्हणाले, ‘मी भारत जोडो यात्रेदरम्यान अनेक राज्यात फिरलो. सगळीकडे गेल्यावर मला फक्त एकचं नाव ऐकू यायचे, ते म्हणजे, गौतम अदानी यांचे. लोकं विचारायचे की, राहुल जी…अदानी कसकाय अनेक क्षेत्रांमध्ये अचानक पुढे जात आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांचे फक्त एक-दोन बिझनेस होते, पण आता त्यांचे आठ-दहा बिझनेस आहेत.’ बेरोजगारी आणि महागाई असे शब्द राष्ट्रपतींच्या भाषणात एकदाही आलेले नाहीत, असा दावा राहुल गांधी यांनी केला. त्यांच्या भारत जोडो यात्रेत ते देशात कुठेही गेले, तिथे अदानी हेच नाव सर्वत्र झळकले, असेही ते म्हणाले. आपल्या गटाशी संबंधित अलीकडच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या नावाचा उल्लेख करून राहुल गांधी म्हणाले की, मी देशात जिथे जिथे गेलो तिथे कुठेही अदानी हेच नाव ऐकायला मिळाले. भारताच्या पंतप्रधानांशी त्यांचे काय नाते आहे, असे लोकांनी विचारले असे देखील राहुल गांधी म्हणाले. तर संसदेत गौतम अदानी यांच्यासंदर्भात बोलताना पंतप्रधान मोदी आणि अदानी यांचे नातं काय? असा सवाल उपस्थित केला. तसेच दोघांचे एकत्र फोटोदेखील दाखवले.

जगातील श्रीमंतांच्या यादीत २०१४ पूर्वी गौतम अदानी यांचा ६०९ वा क्रमांक होता. पण, २०१४ मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर गौतम अदानी काही वर्षातच दुसऱ्या स्थानावर पोहोचले. त्यांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काय संबंध आहेत? मी सांगतो…काही वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते, तेव्हा काही घटनांमुळे अनेकांनी मोदींचा विरोध केला होता. पण, त्यावेळेस फक्त अदानी मोदींच्या बाजूने उभे राहिले होते.’ “२०१४ मध्ये भाजपने सरकार ताब्यात घेतल्यानंतर, विमानतळ विकसित करण्याची जबाबदारी केवळ कंपनी/व्यक्तीलाच दिली जावी असा विद्यमान नियम बदलण्यात आला आणि सहा विमानतळ अदानीकडे सुपूर्द करण्यात आले,” गांधी यांनी नमूद केले. भारताचे परराष्ट्र धोरण अब्जाधीशांच्या फायद्यासाठी तयार केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

अग्निवीर योजना लष्करावर लादली जात असल्याचेही काँग्रेस नेत्याने म्हटले आहे. “निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अग्निवीर योजना आरएसएस, गृह मंत्रालयाकडून आली आहे, लष्कराकडून नाही. अग्निवीर योजना लष्करावर लादली जात असल्याचे ते म्हणाले.

हे ही वाचा : 

Valentine’s Week 2023, जाणून घ्या ७ ते १४ फेब्रुवारीपर्यंत व्हॅलंटाईन वीक कसा केला जातो साजरा

अदाणी समूहाबाबत बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कला मोठा खुलासा, LIC आणि SBI ने …

बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यावर नाना पटोलेंनी दिली प्रतिक्रिया, आमच्याकडे राजीनामा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version