spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महाराष्ट्रातील उद्योग बाहेर नेऊन, पंतप्रधान मोदी राज्यातील युवकांचा रोजगार हिरावून घेत आहेत ; राहुल गांधींचा हल्ला

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नोटाबंदी, जीएसटी आणि प्रकल्पांचे स्थलांतरण या मुद्यावरुन केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तुमचे प्रकल्प गुजरातला जात आहेत. कारण, गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत, त्यामुळं महाराष्ट्रातील प्रकल्प तिथे नेले जात असल्याचे राहुल गांधी म्हणाले. एअरबस आणि फॉक्सकॉन हे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेले आहेत. याच मुद्यावरुन राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली. ते नांदेड जिल्ह्यातील नायगाव इथे बोलत होते.

हेही वाचा : 

हिवाळ्यात या भाजीचा समावेश करा, मधूमेहा सारख्या आजारांना दूर ठेवा

महाराष्ट्रातील उद्योग बाहेर नेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी या राज्यातील युवकांचा रोजगार, त्यांचे भवितव्य हिरावून घेत आहेत, असा हल्ला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चढविला.या देशातील वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्नावर व केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणांवर बोलताना ,राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्रातील एअर बसचा प्रकल्प गुजरातमध्ये अचानक कसा गेला? हे कोणालाही कळले नाही. वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्पही गेला. लाखो कोटी रुपयांची गुंतवणूकही गेली व महाराष्ट्रातील तरुणांचे रोजगारही नरेंद्र मोदींनी हिसकावून घेतले असल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे.

ज्या दिवशी नोटबंदी झाली, ज्या दिवशी चुकीचा जीएसटी लागू झाला त्या दिवशी भारतावर आर्थिक सुनामी आल्याचे गांधी म्हणाले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, मी काळ्या पैशाविरुद्ध लढाई लढत आहे. आता पाच सहा वर्षे झाली. या वर्षांमध्ये काय झालं ते तुमच्यासमोर असल्याचे गांधी म्हणाले. काळा पैसा संपला का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातून एअरबसचा प्रकल्प गेला आहे. तो कुठे गेला? का गेला? हेच कळत नसल्याचे गांधी म्हणाले. गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळं तिथे प्रकल्प जात असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

नेटकरी काय थांबायचं नाव घेईना; Tiger is Back, #SanjayRaut ट्विटरवर ट्रेंडिंग!

राहुल गांधी पुढे म्हणाले की, दोन महिन्यांपूर्वी ही पदयात्रा सुरू केली आणि आता महाराष्ट्रात आली आहे. रोज सात आठ तास आपण चालतो. त्यावेळी युवक, महिला, शेतकरी, यांच्या समस्या ऐकून घेतो. मला यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते. रस्त्यावरून चालणे व गाडीतून चालणे यात फरक आहे. भारत समजून घ्यायचा असेल तर रस्त्यावर चालले पाहिजे. रस्ते कसे आहेत ते आधी कळते व त्यावरून राज्याची अवस्थाही समजते.

पण नरेंद्र मोदींनी त्यावर पाणी फिरवले आहे फक्त चार वर्षेच सेवा करा आणि घरी बसा अशी व्यवस्था करून ठेवली आहे, पण जनतेनी कोणालाही घाबरू नये मनातील भीती काढून टाका. जो ही भीती घालवेल तो द्वेष पसरवू शकत नाही म्हणून मनातून भीती काढून टाका असे आवाहन शेवटी राहुल गांधी यांनी केले.

अरबाज खान आणि मलायका अरोरा पुन्हा एकमेकांच्या आवडीनिवडींचे कौतुक करू लागले

Latest Posts

Don't Miss