spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

काँग्रेसनं जे 70 वर्षात कमावले ते भाजपनं 7 वर्षात गमावले, राहुल गांधींची मोदींवर टीका

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, केंद्रीय यंत्रणाच गरजे प्रमाणे केलेला वापर या विषयी राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. देशात लोकशाहीची हत्या सुरु आहे. देशामध्ये चार लोकांची हुकुमशाही सुरु आहे. सध्या देशातील परिस्थिती भयानक आहे. आम्हाला फक्त अटक केलं जात आहे. काँग्रेसनं जे 70 वर्षात कमावलं ते भाजपनं 7 वर्षात गमावलं आहे, अशी टीका काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी केली.

 पुढे राहुल गांधी म्हणाले, “आम्ही फक्त एकाच राजकीय पक्षासाठी लढत नाही, तर आम्ही संपूर्ण देशातील पायाभूत सुविधांशी लढत आहोत. देशाच्या हितासाठी कोणी आवाज उठवला तर त्याच्या मागे ईडी आणि सीबीआय लावले जाते. त्यामुळे विरोधकांचा प्रभाव दिसत नाही. या आधी पण आम्ही विरोधाकांच्या विरुद्ध बोलण्याचा प्रयत्न केला तर माझ्यावर कारवाई केली जाईल. पण मी घाबरत नाही. आता माझ्यावर आणखी हल्ले होतील. जो धमकावतो तो घाबरत असतो. या लोकांना भारताच्या आजच्या परिस्थितीची भीती वाटते. त्यांनी दिलेल्या आश्वासनांची त्यांना भीती वाटते. लोकांच्या ताकतीला घाबरतात”, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी मोदींवर केला.

महागाई विषयी बोलताना राहुल गांधी म्हणाले, “केंद्रीय अर्थमंत्र्यांना महागाई का दिसत नाही? हेच कळत नाही. ते स्टार्टअप इंडियाबाबत म्हणत आहे, सांगा कुठे आहे स्टार्टअप इंडिया?, लोकांना नोकरीवरुन काढल जात आहे. सरकारचे म्हणणं आहे की, कोरोनामध्ये एकही मृत्यू झाला नाही. कोरोना मध्ये किती कोणाचा मृत्य झाला यांची ठोस नोंदही नाही. अनेक लोक मरण पावले असे संयुक्त राष्ट्र म्हणत आहे, परंतु सरकार मान्य करत नाही आणि हे खोट असल्याचा दावा करत आहे. बेरोजगारीबाबत सरकार म्हणते की यात तथ्य नाही. त्यांच्या हातात सगळी संवादाची साधन देखील आहेत”, राहुल गांधी यांनी म्हटले.

हेही वाचा : 

नरेंद्र मोदींना घाबरत नाही, ईडीच्या कारवाई नंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

Latest Posts

Don't Miss