Tuesday, July 2, 2024

Latest Posts

‘राहुल गांधी स्वतः दहशतवादी…’, रामदास आठवले यांचा हल्लाबोल

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी दिनांक २ जुलै २०२४ रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी दिनांक २ जुलै २०२४ रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी राहुल गांधी यांना दहशतवादी म्हटले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सभागृहात हिंदूंबाबत वक्तव्य केले. स्वतःला हिंदू म्हणवून घेणारे लोक हिंसा आणि द्वेष पसरवत असल्याचे राहुल म्हणाले होते. याबाबत केंद्रीय मंत्री आठवले यांना प्रश्न केला असता त्यांनी राहुलला दहशतवादी म्हटले.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले आहेत की, “राहुल गांधींनी हिंदूंना दहशतवादी म्हटले, ते स्वतः दहशतवादी आहेत. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करणे चुकीचे आहे. राहुल हिंदू समाजाला तोडण्याचे काम करत आहेत.” राहुल यांच्या या वक्तव्यावर बराच गदारोळ सुरू आहे. सोमवारी दिनांक १ जुलै रोजी काँग्रेस खासदाराने सभागृहात आपले म्हणणे मांडले तेव्हा चांगलाच गदारोळ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत : उभे राहून स्पीकर ओम बिर्ला यांना सांगितले की, संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे ही गंभीर बाब आहे.

नेमकं काय घडलं?

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी भगवान शंकराचा फोटो घेऊन आज संसदेत दाखल झाले. त्यांनी भगवान शंकराचा फोटो हातात घेऊन केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. मी या फोटोच्या माध्यमातून काही सांगू इच्छितो. शिवशंकर यांच्यापासून कधीही निर्भय राहण्याची शक्ती मिळते. भगवान शंकाराकडून आपल्याला सत्यापासून कधीही मागे हटू नये, अशी प्रेरणा मिळते. भगवान शंकराच्या डाव्या हातातील त्रिशूळ हे अहिंसाचं प्रतीक आहे. हे त्रिशूळ जेव्हा उजव्या हातात असतं तेव्हा ते हिंसाचं प्रतीक असतं. सत्य, धाडस आणि अहिंसा हेच आमचं संबळ आहे, असे राहुल गांधी म्हणाले. यावेळी सभागृहात गुरुनानक यांचा फोटो दाखवत राहुल गांधी यांनी भूमिका मांडली. “शिवशंकर म्हणतात, घाबरु नका आणि घाबरवू नका. जे लोक स्वत:ला हिंदू म्हणतात आणि 24 तास हिंसा आणि द्वेष पसरवतात, ते हिंदू नाहीत”, असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांच्या भाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्षेप घेतला. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे योग्य नाही, असे पंतप्रधान म्हणाले. तर, गृहमंत्री अमित शाह यांनी जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते हिंसा करतात. त्यांना माहित नाही की करोडो लोक अभिमानाने स्वतःला हिंदू म्हणवतात. ते सगळे हिंसाचार करतात का? राहुल गांधी यांनी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

हे ही वाचा:

‘तुमच्या खुर्चीवर दोन लोक बसलेत…’ Rahul Gandhi यांची लोकसभा अध्यक्ष Om Birla यांच्यावर टीका

राहुल गांधींनी संसदेत भगवान शिवाचा फोटो का दाखवला?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss