राहुल गांधी LIVE : अदानी आणि नरेंद्र मोदी यांचा संबंध काय ???

INDIA आघाडीत आणखी राजकीय पक्षांचा समावेश होणार असल्याचं सूतोवाच मुंबईत बैठकीसाठी आलेल्या आघाडीतील प्रमुख नेत्यांनी केलं आहे.

राहुल गांधी LIVE : अदानी आणि नरेंद्र मोदी यांचा संबंध काय ???

राहुल गांधी LIVE : अदानी आणि नरेंद्र मोदी यांचा संबंध काय ???

INDIA आघाडीत आणखी राजकीय पक्षांचा समावेश होणार असल्याचं सूतोवाच मुंबईत बैठकीसाठी आलेल्या आघाडीतील प्रमुख नेत्यांनी केलं आहे. इंडियाची तिसरी बैठक आज आणि उद्या मुंबईत पार पडणार आहे. या बैठकीसाठी २८ राजकीय पक्षांचे ६३ प्रतिनिधी मुंबईत दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अदानी यांंच्या संबंधातील विषयांना घेऊन कॉंग्रेसने आतापर्यंत १००प्रश्न विचारले आहेत. मात्र, पंतप्रधान यावर मौन बाळगून आहेत. या अनुषंगाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज (गुरुवारी) मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहे. या पतर्कार परिषदेमध्ये राहुल गांधी काय म्हणणार आहे या कडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहेत.

राहुल गांधी यांनी थेट मुद्द्याला हात घालून अदानी विषय उचलून धरला. अदानी समूहाचे आणि भाजपचे खुप जवळचे संबंध आहेत. आणि त्यामुळे त्यांच्यावर कोणतेही कारवाई करण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी अदानींच्या विषयाला हात घालून भारतातला पैसे हा परदेशात जात आहे असे राहुल गांधी यांच्या कडून सांगण्यात आले आहे. राहुल गांधी यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून छापलेल्या वृत्तपत्राचा आढावा घेत अदानी समूहावर हल्लाबोल उठवला आहे. राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आरोप केले आहे. अदानी समूहाच्या या घोटाळ्यामध्ये भारतातला तुमचा आणि आमचा पैसे हा परदेशात जात आहे. आपल्या कष्टाची कामे ही बाहेरच्या देशात जात आहे. हा आपला कमावलेला पैसे भाजप आणि अदानी समूहामध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचे देखील दिसून आले आहे. जर आपल्याला देशाचे हित घडवायचे आहे तर पारदर्शकता असणे महत्वाचे आहे. असे देखील राहुल गांधी म्हणाले.

अदानींच्या या घोटाळ्यासंबंधी तपस का केला जात नाही असा प्रश्न देखील विचारला गेला आहे. आणि त्याचबरोबर वृत्तपत्राच्या दाखल देत मोदी आणि अदानी यांच्यातील कार्तिक व्यवहार असल्याचे देखील सांगितले आहे. आता यामध्ये किती तथ्य आहे हे या पुढच्या काळात पडताळणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नसीर अली शाबान अहली आणि चांग चुंग-लिंग या दोन गुंतवणूकदारांची नावं आहेत. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, हे अदानी कुटुंबाचे दीर्घकालीन व्यावसायिक भागीदार (Longtime Business Partners) आहेत आणि OCCRP नं आपल्या रिपोर्टमध्ये या दोन्ही गुंतवणुकदारांची चौकशी केल्याचं म्हटलं आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, OCCRP नं असा दावा केला आहे. तर सेबीने अदानी याना क्लीनचित का दिली ? असा प्रश्न विचारला गेला.

हे ही वाचा:

OCCRP च्या अहवालानंतर अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठा बदल …

केंद्रासमोर राज्याची भूमिका मांडण्यात राज्य सरकार अपयशी, राष्ट्रवादी काँग्रेस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version