‘तुमच्या खुर्चीवर दोन लोक बसलेत…’ Rahul Gandhi यांची लोकसभा अध्यक्ष Om Birla यांच्यावर टीका

लोकसभेत आज काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे भाषण पार पडले. त्यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.

‘तुमच्या खुर्चीवर दोन लोक बसलेत…’ Rahul Gandhi यांची लोकसभा अध्यक्ष Om Birla यांच्यावर टीका

लोकसभेत आज काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे भाषण पार पडले. त्यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) त्यांनी भाजप आणि आरएसएसवर जोरदार टीका केली. तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Loksabha Speaker Om Birla) यांच्यावर सुद्धा त्यांनी यावेळी भाष्य केले. ओम बिर्ला यांना ‘तुमच्या खुर्चीवर लोकसभा अध्यक्ष आणि श्री ओम बिर्ला अश्या दोन व्यक्ती बसल्या आहेत,’ असे ते यावेळी म्हणाले.

आजचा लोकसभेतील दिवस राहुल गांधी यांच्या भाषणाने चांगलाच गाजला. राहुल गांधी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला केला. तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावरही त्यांना मिश्किल टीका केली. ओम बिर्ला यांना ते म्हणाले, “तुमच्या खुर्चीवर दोन लोक बसले आहेत. एक लोकसभा अध्यक्ष आणि दुसरे श्री. ओम बिर्ला”

लोकसभा अध्यक्ष निवडीनंतर ओम बिर्ला यांनी अभिनंदन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी त्यांच्या आसनापर्यंत पोचवायला गेले होते. त्यावेळी या दोघांनी ओम बिर्ला यांच्यासोबत हस्तांदोलन देखील केले. तो मुद्दा सांगत ते पुढे म्हणाले, “जेव्हा मोदीजी आणि मी तुमच्याशी हात मिळवायला आलो तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली. जेव्हा मी तुमच्याशी हात मिळवला तेव्हा तुम्ही अचानकपणे ताठ उभे राहिले होतात पण जेव्हा मोदीजी यांनी तुमच्याशी हात मिळवला तेव्हा तुम्ही त्यांच्यासमोर झुकून हात मिळवलात…” राहुल गांधी यांच्या या विधानानंतर संसदेत गोंधळ सुरु झाला.

राहुल गांधी यांनी आज अनेक मुद्दे घेऊन सरकारवर टीकास्त्र सोडले. यावेळी राहुल गांधी म्हणाले, ‘मोदीजींनी एके दिवशी आपल्या भाषणात सांगितले की, भारताने कधीही कोणावरही हल्ला केला नाही. त्याला कारण आहे. भारत हा अहिंसेचा देश आहे, तो घाबरत नाही. आपल्या महापुरुषांनी हा संदेश दिला – घाबरू नका, घाबरू नका. शिवजी म्हणतात- घाबरू नका, घाबरू नका आणि त्रिशूळ जमिनीत गाडून टाका. दुसरीकडे, जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते २४ तास हिंसा-हिंसा-हिंसा…द्वेष-द्वेष-द्वेषात गुंततात… तुम्ही मुळीच हिंदू नाही. सत्याचे समर्थन करावे असे हिंदू धर्मात स्पष्ट लिहिले आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ सुरू केला. पीएम मोदी आपल्या खुर्चीवरून उभे राहिले आणि त्यांनी ही गंभीर बाब असल्याचे सांगितले. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे ही गंभीर बाब असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. यावर राहुल गांधी म्हणाले की, पीएम मोदी आणि भाजप हा संपूर्ण हिंदू समाज नाही.

हे ही वाचा:

Mumbai Graduate Constituency : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निकालात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

जितेंद्र आव्हाड यांनी केला मोठा आरोप, वर्ल्ड कपच्या नावाखाली…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version