छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी PM Narendra Modi यांनी महाराष्ट्रातील प्रत्येकाची माफी मागावी: Rahul Gandhi

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी PM Narendra Modi यांनी महाराष्ट्रातील प्रत्येकाची माफी मागावी: Rahul Gandhi

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या हस्ते आज सांगली जिल्ह्यातील कडेगाव मध्ये माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या ‘लोकतीर्थ’ या स्मारकाचे लोकार्पण आणि पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मनोगत व्यक्त करून माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला. “छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील प्रत्येकाची माफी मागावी,” असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

यावेळी राहुल गांधी म्हणाले, “पुर्वी सकारात्मक राजकारण केलं जात होतं. मात्र आता देशातील राजकारणात विचारधारेचे युद्ध सुरू झाल आहे. महाराष्ट्रातील महापुरुषांनी जी वैचारिक लढाई लढली आहे, त्याच विचारावर आज सुद्धा काँग्रेस भाजपसोबत लढत आहे. आम्ही सर्व घटकांना एकत्रित घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. मात्र भाजप समाजा-समाजामध्ये द्वेष पसरवत आहे. मुठभर लोकांच्या हातात भारत द्यायचा हा भाजप डाव करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी वैचारिक लढाई लढली, तीच लढाई काँग्रेस लढत आहे,” असं मतही राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केलं.

ते पुढे म्हणाले, “सद्या दोनच व्यक्ती देश चालवत आहेत. अदानी आणि अंबानी या दोनच लोकांवर देशाच्या सरकारचा कारभार सुरू आहे. कारण यांनाच सर्व कॉन्टॅक्ट मिळतात. अदानी आणि अंबानी हे देशात रोजगार उपलब्ध करू शकणार नाहीत. मात्र लहान लहान जे उद्योजक आहेत तेच रोजगार उपलब्ध करू शकतील. महाराष्ट्रात चोरी करून बनवलेलं सरकार हे जाणार असून येत्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार सत्तेवर येईल. भाजप देशातील प्रत्येक शासकीय यंत्रणेमध्ये आर. एस. एस. च्या विचारांची लोक घुसवत आहेत. खासदार राहुल गांधी पुढे म्हणाले, काँग्रेस पार्टी आणि आमचे सर्व घटक पक्ष कोणत्याही परिस्थितीत, देशात जाती निहाय जनगणना करायला लावणारच आहे,” असा दावाही खासदार राहुल गांधी यांनी यावेळी केला.

“माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांनी महाराष्ट्राच्या विकासात आणि शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिलं आहे. आयुष्यभर ते काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ राहिले. श्रीमती इंदिरा गांधी यांचा पराभव झाला होता, त्यावेळी त्या परिस्थितीत सुद्धा पतंगराव कदम हे खंबीरपणे गांधी परिवारावर सोबत होते,” असे ही राहुल गांधी यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक, खासदार छत्रपती शाहू महाराज, खासदार विशाल पाटील, माजी मंत्री विश्वजीत कदम, माजी आमदार मोहनराव कदम, माजी मंत्री सतेज पाटील यांच्या समवेत महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते, खासदार आणि आमदार उपस्थित होते.

हे ही वाचा:

 महाराष्ट्रातील शिक्षणाचा दर्जा वाढून गुणवंत महाराष्ट्र घडविण्यात शिक्षकांचे योगदान मोलाचे – Deepak Kesarkar

Uddhav Thackeray यांना त्यांची जागा कळाली आहे: Sanjay Shirsat

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version