‘मी कधीच डगमगलो नाही’ राहुल गांधीनी केलं वक्तव्य

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सतत ईडीच्या ऑफिसमध्ये चौकशी साठी बोलवण्यात येत आहे.

‘मी कधीच डगमगलो नाही’ राहुल गांधीनी केलं वक्तव्य
नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सतत ईडीच्या ऑफिसमध्ये चौकशी साठी बोलवण्यात येत आहे. सलग पाच दिवसात 40 तास चौकशी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत संयमी राहणे ही काँग्रेसची शिकवण आहे. त्यामुळेच मी थकलेलो नाही. माझ्यात अजूनही कोणताही तणाव नाही. सध्या तुम्ही 11 तास चौकशी करता तर अजुन 10 तास चौकशी करा. मला काही वाटत नाही असे राहूल गांधी यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
मात्र ईडीच्या कार्यालयात राहुल गांधी यांना कोणते प्रश्न विचारण्यात आले हे अजूनही त्यांनी स्पष्ट केलेले नाही. एका लहानश्या खोलीत ईडीच्या तीन अधिकाऱ्यांनी माझी चौकशी केली. चौकशी करताना माझ्याबरोबर काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता आणि नेते होते. काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता म्हणून मी कधीच डगमगलो नाही मीच काय तर कोणत्याही कार्यकर्त्यावर वेळ आली तर ते सुद्दा डगमगणार नाही. असे राहूल गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यालयात सांगितले त्यावेळी तिथे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी देखील तिथे उपस्थित होत्या.
सोनिया गांधी यांना देखील ईडीच्या चौकशीसाठी कार्यालयात बोलावले आहे मात्र त्यांना कोरोना तसंच फुफ्फुसांच्या आजारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्या घरी आल्या असून त्या सध्या आराम करत आहे त्यामुळे त्यांनी ईडी च्या अधिकाऱ्यांकडे चार हफत्यांची मुदत वाढवून घेतली आहे.
Exit mobile version