राहुल गांधी यांनी लाल चौकात फडकळवला तिरंगा

राहुल गांधी यांनी लाल चौकात फडकळवला तिरंगा

काँग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा आज (रविवारी) श्रीनगरच्या लाल चौकात पोहोचली, त्यानंतर राहुल गांधींनी लाल चौकाला भेट दिलीआणि तिरंगा फडकवला. त्यानंतर राहुल गांधी आणि इतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्थानिक काश्मिरी लोकांसोबत राष्ट्रगीत गायले. यादरम्यान लाल चौकात राहुल गांधींचा एक कट आऊटही दिसला, जो आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजापेक्षा मोठा होता.

श्रीनगरमधील लाल चौकातील छायाचित्रांमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी आपल्या देशाचा राष्ट्रध्वज फडकावताना दिसत आहेत. यानंतर ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत गायले गेले. राष्ट्रगीतानंतर राहुल गांधी यांनीही राष्ट्रध्वजाला वंदन केले. राहुल गांधी आज संध्याकाळी ५.३० वाजता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदही घेणार आहेत. यानंतर ३० जानेवारीला श्रीनगरमध्ये (Srinagar) समाप्त होणार आहे. याबाबत रविवारी काँग्रेसने एक ट्विटही केले आहे. त्यांनी लिहिले की, कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतची पदयात्रा, द्वेषाला हरवून हृदय जोडण्यासाठी; अशक्य वाटणारी भारत जोडो यात्रा इतिहासाच्या पानांमध्ये नोंदली गेली आहे. जी आज पांथा चौकातून सोनवार चौकापर्यंत (From Pantha Chowk to Sonwar Chowk) जाऊन लाल चौकात अभिमानाने तिरंगा फडकवणार आहे. प्रवास सुरूच आहे आणि जय हिंद सर्वांना भारी आहे.

भारतीय सीमाभागावरील चिनी घुसखोरीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने मोदी सरकारला लक्ष्य करत आहे. अलीकडेच अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील यांगत्से सीमाभागात चिनी सैनिक आणि भारतीय लष्कराच्या जवानांमध्ये झटापट झाल्याचं समोर आलं होतं. यावरून केंद्र सरकारचं चीन धोरण पूर्णपणे चुकलं आहे, असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला होता. याला उद्देशूनच आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राहुल गांधींवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

हे ही वाचा:

आपण स्वभावाने लोकशाही समाज आहोत, मन की बातमधून पंतप्रधान मोदींनी साधला संवाद

IND vs NZ, भारतासाठी करो या मरोचा सामना, ‘या’ खेळाडूंना मिळू शकेल सामन्यात खेळण्याची संधी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version