spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारत जोडो यात्रेत राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल – म्हणाले, भाजप आपली विचारधारा देशावर लादत आहे

काँग्रेस पक्षाने आता २०२४ च्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा काढण्यात येत आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी कन्याकुमारी येथून पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राहुल म्हणाले की, देशातील संवाद संपला आहे. भाजपच्या विचारसरणीमुळे देशाचे नुकसान होत आहे. भाजप आपली विचारधारा देशावर लादत आहे. असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले.

ब्रह्मास्त्र रिलीजसह, आयनॉक्स आणि पीव्हीआरच्या स्टॉक्समध्ये झाली मोठी घसरण

राहुल गांधी यांचा भाजपवर हल्लाबोल

काँग्रेसला वाचवण्यासाठी ‘भारत जोडो यात्रे’चं आयोजन करण्यात आलं आहे, अशी टीका भाजपने केली आहे. त्यावर राहुल गांधीनी जोरदार पलटवार केला आहे. “भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपले विचार मांडायला स्वातंत्र आहे. आम्ही लोकांसोबत जोडण्यासाठी ही यात्रा करत आहोत. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून जमिनीवर काय परिस्थिती आहे, याची माहिती घेत आहोत. त्यासोबत भाजप, स्वयंसेवक संघाने केलेल्या नुकसानाची भरपाई करण्याचं काम करतं आहे,” असं राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा : 

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर, भारतात एक दिवसाचा शोक पाळण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

आता काँग्रेस पक्षासाठी पूर्व वेळ अध्यक्षाची निवडणूक होणार आहे. येत्या १७ ऑक्टोबरला त्यासाठी मतदान होईल. मात्र, ही निवडणूक लढणार की नाही यावरती आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भारत जोडो यात्रे’चा दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अध्यपदाच्या शर्यतीतून बाहेर नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. “मी काँग्रेसचा अध्यक्ष होणार की नाही, हे निवडणुका झाल्यावर स्पष्ट होईल. मला काय करायचं आहे, ते मी ठरवलं आहे. त्याबाबत कोणताही गोंधळ नाही,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Latest Posts

Don't Miss