spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

आज राजकारणात सर्वात मोठी आणि खळबळजनक घटना ही घडली आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण देशात तीव्र नाराजी ही व्यक्त केली जात आहेत.

आज राजकारणात सर्वात मोठी आणि खळबळजनक घटना ही घडली आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण देशात तीव्र नाराजी ही व्यक्त केली जात आहेत. तसेच अनेक ठिकाणी निदर्शने देखील केली जात आहेत. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे. राहुल गांधी यांनी स्वतः ट्वीट करत आपली बाजू मांडली आहे. त्याचबरोबर आपली बाजू मांडत लढण्याची तयारी दर्शवली आहे.

 भारतासाठी लढत आहे, त्यासाठी कोणताही किंमत चुकवण्यास तयार असल्याचे राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. राहुल गांधी यांची खासदारी रद्द झाल्यानंतर देशभरात काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनास सुरुवात केली आहे. तसेच इतर विरोधीपक्षातील नेत्यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. “मैं भारत की आवाज़ के लिए लड़ रहा हूं। मैं हर कीमत चुकाने को तैयार हूं।” असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे. खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी यांच्या ट्वीटला अल्पावधीतच लोकांकडून रिस्पॉन्स दिला जात आहे. अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केले आहेत. देशातील सर्व जनता तुमच्यासोबत आहे… असे एका युजर्सने म्हटले तर अन्य एका काँग्रेस समर्थक युजर्सने म्हटले की, हिटलरशाहीच्या विरोधातील लढ्यात आम्ही तुमच्यासोबत आहोत.

२०१९ च्या निवडणुकी दरम्यान कर्नाटकातील एका प्रचारसभेत राहुल गांधी यांनी देशात पळून गेलेल्या आरोपींबद्दल बोलताना मोदी आडनावा विषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यांवरून काल गुजरातमधील सुरत न्यायालयाने राहुल गांधींना त्यांच्या विधानासाठी २ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती आणि उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी ३० दिवसांची मुदतही राहून गांधी यांना दिली होती. परंतु आज काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत. सुरत न्यायालयाने त्यांना काल दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या १० जुलै २०१३ च्या निकालानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा सचिवालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, २३ मार्च २०२३ पासून कलम १०२(१)(ई) च्या तरतुदींनुसार त्यांना लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आलं आहे.लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम ८ चा आधार या निर्णयासाठी घेण्यात आला आहे.

हे ही वाचा : 

ChatGPT चे फायदे आणि तोटे ?

LIVE राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसची पत्रकार परिषद

Gudi Padwa Special गुढीची साडी व मिरवणुकीसाठी फेटे | Dadar Shopping Market

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss