नरेंद्र मोदींना घाबरत नाही, ईडीच्या कारवाई नंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

नरेंद्र मोदींना घाबरत नाही, ईडीच्या कारवाई नंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्डच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी काल बुधवारी ईडीने ‘हेराल्ड हाऊस’ मधील यंग इंडिया कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकले. त्यानंतर कॉंग्रेस पक्ष कडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गांधी यांनी म्हटले, हा सर्व प्रकार म्हणजे दबाव टाकण्यासाठी केलेली कारवाई आहे, धमकावण्याचा प्रयत्न आहे. त्यांना वाटत असेल की थोडा दबाव टाकून हे गप्प बसतील. पण आम्ही गप्प बसणार नाही, त्यांनी काहीही केलं तरी आम्ही ठामपणे उभे राहणार. आम्हाला काही फरक पडत नाही, असे म्हणत आपली ठाम भूमिका राहुल गांधी यांनी मांडली.

संजय राउतांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढणार का?, न्यायालयात आज सुनावणी

पुढे ते म्हणले, आम्ही नरेंद्र मोदींना घाबरत नाही. आमच्यावर काही फरक पडणार नाही. देशाचे संरक्षण करण, येथील लोकशाही जपणे, हे माझं काम आहे आणि मी ते करत राहणार, अस म्हणत राहुल यांनी भाजपाला थेट आव्हान दिले आहे.

नॅशनल हेराल्डच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नुकतीच चौकशी केली आहे. त्याशिवाय ईडीने नॅशनल हेराल्ड कार्यालयाच्या अनेक ठिकाणी छापे टाकले असून इमारतीचा काही भाग सील करत हा भाग परवानगीशिवाय उघडला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : 

Thackeray V/S Shinde : सत्तासंघर्षावर सुनावणी आता सोमवारी, आजच्या सुनावणीत काय झाले? वाचा सविस्तर

Exit mobile version