spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल, असा असेल राहुल गांधींचा आजचा कार्यक्रम

काँग्रेसची भारत जोडो यात्रा अखेर काल रात्री महाराष्ट्रात दाखल झाली. काँग्रेसच्या यात्रेचं महाराष्ट्रात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. तेलंगाणामधल्या मिर्झापूर येथून मशाल हाती घेवून या पद यात्रेला सुरुवात झाली. या यात्रेत मशाल हाती घेऊन हजारो काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. फटाक्यांच्या आतिषबाजीत महाराष्ट्राच्या सीमेवर राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात आले. राहुल गांधी हे स्वतः हातात मशाल घेवून चालत होते. प्रचंड उत्साह आणि भारत जोडोच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मशाल यात्रेत तरुणांची संख्या लक्षणीय होती. ८ वाजून ५० मिनिटाला सुरू झालेली मशाल पदयात्रा पुढे येऊन देगलूरमध्ये पोहचली.त्यानंतर राहुल गांधी यांनी छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून सभेला संबोधीत केले त्यावेळी त्यांनी मोदींवर टीका केली. राहुल गांधी यांनी उपस्थित लोकांना त्याचे प्रश्न मला सांगा त्यासाठीच मी आलोय असं आव्हान केले.

हेही वाचा : 

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल; हाती मशाल घेऊन राहुल गांधी नांदेडमध्ये

समोर येत असलेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे यात्रेची जाबबादारी देण्यात आली आहे. या यात्रेसाठी नांदेड जिल्ह्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने २८ पदाधिकारी नियुक्त केले असून सगळे पदाधिकारी सध्या नांदेडला दाखल झाले आहेत . नांदेड जिल्ह्यातील यात्रा पूर्ण होईपर्यंत ते नांदेडलाच मुक्कामी राहणार आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी घटक पक्षातील उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार, शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांना या यात्रेसाठी काँग्रेस पक्षाकडून आमंत्रण देण्यात आले आहे. भारत जोडो यात्रेमध्ये महाविकास आघाडीमधील नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.

रहुल गांधींची यात्रा सोमवारी रात्री महाराष्ट्रात देगलूर येथे दाखल झाली आहे. यावेळी त्यांच्या सोबत हजारो काँग्रेसचे कार्यकर्ते होते, ज्यांच्या हातात मशाली होत्या. या यात्रेचं काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात जंगी स्वागत केलं आहे. ही यात्रा आजपासून महाराष्ट्र सुरु झाली असून पुढील १४ दिवस राहुल गांधी हे महाराष्ट्रात मुक्कामी असणार आहेत. यावेळी अनेक कार्यक्रम, सभा आणि चौकसभांचे आयोजन करण्यात आले आहे. यातच आज राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा प्रवास कसा असणार आहे, राहुल गांधी यांच्या कुठे सभा आणि कार्यक्रम होणार आहे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Hair Care Tips: केस ओले ठेऊन झोपल्यास उद्भवू शकताता ‘या’ समस्या

असा आहे राहुल गांधी यांच्या आजचा कार्यक्रम

सकाळी ८.३० वाजता- नांदेडमधील गुरुद्वारापासून यात्रेला सुरुवात होईल.

सकाळी ९.३० वाजता- अटकाळी गावाजवळ विश्रांती.

दुपारी ४ वाजता- पदयात्रेला खतगाव फाट्यापासून सुरुवात होईल.

संध्याकाळी ७ वाजता- संध्याकाळची विश्रांती.

Latest Posts

Don't Miss