महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रसिद्ध नेत्यांपैकी राज ठाकरे हे अत्यंत लोकप्रिय नेते आहेत. राज ठाकरे हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि दबंग प्रतिमेमुळे नेहमीच चर्चेत असतात. राज ठाकरे हे त्यांच्या रोखठोक भूमिकेमुळे तरुणाईंना तसेच प्रत्येकालाच प्रचंड आवडतात. राज ठाकरे यांना बघून अनेक जण घाबरतात. परंतु सर्वांनाच आवडणाऱ्या या नेत्याच्या प्रेम प्रकरणाबद्दल तुम्हाला माहित आहे का? नसेल तर चला जाणून घेऊयात.
९० च्या दशकाचा काळ असा होता जेव्हा ठाकरे कुटुंबातील या तरुण नेत्याची प्रेमकहाणी प्रचंड चर्चेत असायची. राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे ९० च्या दशकात प्रेमसंबंधात होते असे आज ही म्हटले जाते. सोनाली बेंद्रेच्या फिल्मी करिअरला पुढे नेण्यासाठी राज ठाकरेंनीही खूप मदत केली होती, अश्या ही चर्चा केल्या जातात.
राज ठाकरे किंवा सोनाली बेंद्रे या दोघांनीही हे नातं स्वीकारलं नाही. मात्र, दोघेही प्रेमात असल्याच्या बातम्या अनेकदा उडत होत्या. सोनाली बेंद्रेचा आग हा पहिला चित्रपट पाहून राज ठाकरे वेडे झाल्याचे बोलले जाते. दोघांचे प्रेम जोरात चालू होते. मायकल जॅक्सन भारतात शो करण्यासाठी आला होता, तेव्हा सोनाली बेंद्रे राज ठाकरे यांच्यासोबत विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी आली होती, यावरूनही दोघांच्या जवळीकीचा अंदाज लावता येतो. विमानतळावरील घटनेची छायाचित्रे आणि व्हिडिओ फुटेजने त्या काळात चांगलीच खळबळ उडवून दिली होती. या पॉप स्टारला रिसीव्ह करण्यासाठी राज ठाकरे आणि सोनाली पारंपरिक लूकमध्ये पोहोचले. राज ठाकरेंनी कुर्ता-पायजमा असलेले नेहरू जॅकेट घातले होते, तर सोनालीने मराठी साडी नेसली होती आणि केसात गजरा सुद्धा घातला होता.
राज ठाकरे यांचे शर्मिला यांच्याशी लग्न होऊनही राज ठाकरे सोनालीच्या प्रेमात वेडे होते, असे बोलले जाते. ठाकरे यांनाही सोनालीशी लग्न करायचे होते परंतु त्यांचे काका म्हणजे बाळ ठाकरे यांनी त्यांना तसे करण्यापासून रोखले. बाळ ठाकरेंनी राज ठाकरेंना पुन्हा लग्न करण्यापासून रोखले होते, असे बोलले जाते. यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर वाईट परिणाम होऊन त्यांच्या समर्थकांमध्ये चुकीचा संदेश जाईल, असे बाळ ठाकरे यांनी त्यांना सांगितले होते.
हे ही वाचा:
प्रभुदेवा बनला वयाच्या ५०व्या वर्षी बाबा
Charu- Rajeev Sen यांचा झाला घटस्फोट, फोटो शेअर करत लिहिले…
राज्यामधील गद्दार सरकारची लवकरच अनिव्हर्सरी, सुप्रिया सुळेंची खोचक टीका