spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Raj Thackeray यांनी विधानसभा निवडणुकांसाठी कसली कंबर ; पदाधिकारी मेळाव्याचे केले आयोजन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे हे विविध घटनांवरून राजकीय वर्तुळ सतत चर्चेचा विषय बनत आहेत. त्याचप्रमाणे यंदाही विधासभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी हातपाय उचलण्यास सुरुवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. भाजप, काँग्रेस, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पावर गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून या सर्वच पक्षांकडून विधानसभेसाठी चाचपणी सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकलं होतं. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही जोरदार कामाला लागली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात एक मेळावा आयोजित केला आहे. गुरुवारी २५ जुलै सकाळी ११ वाजता हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील मनसे (MNS) पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते विधानसभेच्या दृष्टीने काय नवी पाऊले उचलायला मिळतील यासंदर्भात चर्चा करतील.

पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय आढावा घेण्यासाठी पक्षातील नेते, पदाधिकारी यांची नियुक्ती केली होती. या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना त्या जिल्ह्यातील अहवाल सादर केला आहे. या निरीक्षक अहवालाबद्दलची माहिती घेतल्यानंतर आज राज ठाकरेंनी पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन केले आहे.

त्यामुळे आजच्या होणाऱ्या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तसेच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ते पदाधिकाऱ्यांना काय सूचना देणार, त्यांना काय मार्गदर्शन करणार याचीही उत्सुकता पाहायला मिळत आहे. दरम्यान यापूर्वी झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे स्वबळाचा नारा देणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

हे ही वाचा:

heavy rainfall : पावसाने पळवले मुंबईकरांच्या तोंडचे पाणी ; रेल्वे वाहतुकीवर झाला परीणाम

heavy rainfall : पावसामुळे नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी ; जनजीवन झाले विस्कळीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss