राज ठाकरेंनी भाजपासह इतर पक्षांवर केली टीका

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) या पक्षाचा आज पनवेल (Panvel) येथे मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हजेरी लावून भाषणाला सुरवात केली.

राज ठाकरेंनी भाजपासह इतर पक्षांवर केली टीका

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) या पक्षाचा आज पनवेल (Panvel) येथे मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हजेरी लावून भाषणाला सुरवात केली. या मेळाव्यात भाषण करताना भाजपसोबत (BJP) इतर पक्षांनादेखील टोला दिला. या मेळाव्यात त्यांनी परत एकदा ब्रम्हास्त्र सोडले. राज ठाकरे आपल्या भाषणाची सुरवात करत म्हणाले, समृद्धी महामार्गाला अजूनही फेन्सिंग (fencing) टाकलेले नाहीत, त्या महामार्गावर बकरी, हरणे, गाई-गुरे येत राहतात. अचानक गाडीच्यासमोर जनावरे आली तर नेमकं करायचं तरी काय? त्या महामार्गावर आतापर्यंत जवळजवळ ३५० जण मृत्युमुखी पडलेली आहेत. आम्ही फेन्सिंग लावणार नाही, परंतु टोल (Toll) नक्कीच लावणार. इथं पैसे भरा आणि आणि इथंच मरा. अशी सरकारे कुठे असतात का? असा प्रश्नदेखील राज ठाकरे यांनी केला आहे.

महाराष्ट्र राज्यात कुठे जायचं म्हटलं तरी आपल्याला यूटर्न मारून जावे लागते. मुंबई- गोवा हायवेवर (Mumbai-Goa Highway) १५,५५६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. परंतु रस्ता मात्र पूर्ण झालेला नाही. याविषयाबाबत मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांना फोन केला तेव्हा त्यांनी मला सांगितले की मी लक्ष घातले पण कंत्राटदार (Contractor) पळून गेले, काही जण कोर्टात गेलेत. यामागे कोणाचे काही काम तर सुरु नाही ना असे देखील राज ठाकरे म्हणाले. कोकणातील महामार्गाचे (Konkan Highway) काम नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी पुढच्यावर्षी म्हणजेच २०२४ पर्यंत लोकांसाठी पूर्णपणे चालू होईल असे सांगितले आहे.

सध्या गणेशोत्सव आणि येणाऱ्या काळात शिमगा सारखे उत्सव सुरू होणार आहे आणि तेव्हा सामान्य जनता हि कोकणात जाते असते. त्यावेळी सामान्य जनतेला राष्टनाचा समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात कोकणातले महामार्ग खरंच प्रवासासाठी चांगले आहेत का ? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.मुंबई गोवा महामार्ग आणि समृद्धी महामार्ग वरून जाताना खड्ड्यांच्या समस्यांना जनतेला सामोरे जावे लागणार आहे. परंतू आताच्या गणपतीचे काय? आतापर्यंत मृत्युमुखी झालेल्यांचे काय? अडीच हजार लोकांचे जीव गमावलेले आहेत. बिचारे गावी फिरायला गेले होते आणि त्यांचे जीव गेले. सगळेचजण ढिम्म आहेत. यांच्याकडे फक्त एकमेव कारण आहे, आम्ही काहीही केलं, कसलेही रस्ते दिले तरी एका कोणत्यातरी विषयावर ही सर्व लोक मतदान करणार, हा धंदा आहे. एखादा रस्ता हा पुढील २५-३० वर्षांसाठी चांगला केला तर पैसे खायचे कसे ? तो रस्ता सहा महिन्याच्या आत खराब झालाच पाहिजे. नवीन टेंडर, नवीन पैसे, नवीन कंत्राटदार, नवीन टक्के. जे लोक खोके खोके असे ओरडतायत त्यांच्याकडे अवघे कंटेनर्स आहेत. त्यालोकांनी कोविडलाही (Covid) सोडले नाही, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली आहे.

हे ही वाचा:

पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांनी केला हल्लाबोल

Taali चित्रपट पहिल्यानंतर गौरी सावंत यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version