राज ठाकरेंचा राहुलगांधींवर खरपुस शब्दांत टीका

राज ठाकरेंचा राहुलगांधींवर खरपुस शब्दांत टीका

मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे यांनी आज गोरेगावमधील नेस्को सभागृहात कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि भगतसिंग कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. निवडणुकीच्या पार्शवभूमीवर आज मुंबई मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गट अधिकाऱ्यांशी संवाद साधला. एकनाथ शिंदेंनी रात्री कांडी फिरवल्यानंतर उद्धव ठाकरे घराबाहेर पडल्याचा टोला राज ठाकरेंनी लगावला. शिवाय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं शिवरायांविरोधातील विधान आणि राहुल गांधींच्या सावकरांविरोधातील वक्तव्यावरून सुरू झालेल्या वादावर राज ठाकरेंनी चांगलंच सुनावलंय. गांधी-नेहरूंच्या बदनामीचं कारस्थान थांबवण्याचा सल्ला यावेळी राज ठाकरेंनी भाजपला दिला. तर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्त्व्यावरून राज ठाकरेंनी तीव्र संताप व्यक्त केला.

“महापुरुषांची बदनामी केली जात आहे. त्या दिवशी राहुल गांधी महाराष्ट्रात आले होते. ते गुळगुळीत मेंदूचे आहेत. हल्ली राहुल गांधी बोलतात की त्यांच्या मागे आर.डी. बर्मन बोलतात हेच समजत नाही. अरे गधड्या सावरकरांबद्दल बोलायची तुझी लायकी आहे का. सावरकर यांना कोठे ठेवले होते, त्यांनी काय हालअपेष्टा सहन केल्या, याची कल्पनातरी आहे का?” असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

काँग्रेसला जसं सांगणं आहे तसेच भाजपला आणि इतर पक्षांना सांगणे आहे हे बस करा. जे आयकॉन म्हणून बनले त्याची बदनामी करून काय होणार नाही. दोन्ही बाजूंनी आमच्या स्वातंत्र्यसैनिकांची बदनामी होतेय. मी एक पंडित जवाहरलाल नेहरूंचा फोटो पाहिला. सोशल मीडियावर तो फोटो फिरत होता. त्यांचं अफेयर आहे असं तिथं लिहिलं होतं. कोण आहे ती बाई, कोण आहे ती मुलगी, जी गालाचे चुंबन घेत होती. ती नेहरूंची नात किंवा परिवारीतल मुलगी होती. कसला तरी एक फोटो काढायचा आणि सुरू करायचं. हे या बाजूने चालणार मग काँग्रेसवाले सावरकरांवर बोलणार. बसं झालं आता हे सर्व, असा सल्ला राज ठाकरेंनी दिला. तुम्ही या नेत्यांचा अपमान करून काय मिळवणार, असंही ते म्हणाले.

हे ही वाचा : 

वय काय, बोलतोय काय, काय चाललंय? राज ठाकरेंचा राज्यपालांवर घणाघात

यांच्या आंगावर एकतारी केस आहे का ? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version