Har Har Mahadev : “भगवा ज्याचा श्वास तो मराठी…” राज ठाकरे ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा एक भाग

Har Har Mahadev : “भगवा ज्याचा श्वास तो मराठी…” राज ठाकरे ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा एक भाग

बहुचर्चित मराठी सिनेमा ‘हर हर महादेव’ प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. सोशल मीडियावर आजच त्याचा अधिकृत ट्रेलरही भेटीला आला आहे. युट्युबवर लॉन्च करण्यात आलेल्या या दमदार ट्रेलरची ओळख करुन देताना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, ”स्वराज्य उभं राहतं ते कर्तव्याच्या तकलादू भितींवर नाही तर त्यासाठी लागतो इमानाचा काळा दगड!” सादर करत आहोत स्वराज्याच्या निष्ठेची, बलाढ्य शक्तीची, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमांच्या गाथेची झलक. येतोय ‘हर हर महादेव’ २५ ऑक्टोबरपासून मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या ५ भाषांमधून आपल्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाच्या माध्यमातून एक महाराष्ट्रातील राजकारण्यांचा आवाज ऐकायला प्रेक्षकांना भेटणार आहे. ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो’ हाच आवाज आता सह्याद्रीचा आवाज बनून आपल्या ऐकू येणार आहे. तो आवाज म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आवाज. या चित्रपटाचा एक भाग राज ठाकरे असल्या उत्सुकता ताणून धरणारी कारणंही तेच बनले आहते. त्याच सोबत सर्वांचा आवडता अभिनेता सुबोध भावे या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय. शरद केळकर बाजीप्रभुंच्या भूमिकेत आहे.

हेही वाचा : 

राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पाठवलेल्या पत्रावर शिंदेगटाने दिली पाहिली प्रतिक्रिया म्हणाले…

हर हर महादेव या चित्रपटाचा भाग राज ठाकरे असल्याचे आज चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान समोर आले. आता पर्यंत ते गुपित असल्याने त्याची चर्चा कुठेच नव्हती. मात्र आज १६ ऑक्टोबर रोजी या चित्रपटाचे प्रमोशन सुरु असताना अभिनेता सुबोध भावे याने राज ठाकरेंची विशेष मुलखात घेत. एका राजकारण्याला त्याच्यात दडलेल्या कलेसाठी बोलते केलं.

मुलाखती दरम्यान राज म्हणाले, हर हर महादेव हाच चित्रपट का, मला पहिल्यांदा व्हाईस ओव्हर दिला होता तो २००३ मध्ये बाबासाहेब पुरंदरे यांची मुलाखत घेतली होती. तेव्हा ती अचानक जबाबदारी माझ्य़ावर आली होती. व्हाईस ओव्हर देणे हे माझे काम नाही. मी त्याचा कधीही विचार केला नाही.२००४ मी शिवसेनेचे कॅम्पेन केले होते. त्या ९ फिल्म्सचा आवाज अजित भुरे यांचा होता. मुंबईवरील बॉम्बस्फोटाच्या एका अॅड फिल्मला माझा आवाज होता. फिल्म झाली बाळासाहेबांना त्या आवडल्या. मुंबई कोण बोललं आहे? भुरे यांनी म्हटलं राज यांनी दिला आहे. त्यानंतर बाळासाहेबांनी उर्वरीत ९ शॉर्ट फिल्म्सला आवाज द्यायला सांगितले होते.

Raj Thackeray : ‘भाजपने निवडणूक लढवू नये’ अंधेरी पोटनिवडणुकीबाबत राज ठाकरेंचे फडणवीसांना पत्र

राज ठाकरेंनी केलं अभिनेता शरद केळकरचे कौतुक

सगळ्यात बुलंद आवाज शरद केळकर यांचा आहे. माझ्या आवाजापेक्षा दुसरा कोणताही नाही. असं राज यांनी सांगितले. मला चित्रपट चांगला की वाईट यानं फरक पडत नाही. मला चित्रपट करताना कष्ट घेतले की नाही हे जास्त महत्वाचे वाटते. तुम्ही स्क्रिन प्ले वाईट आहे. एडिटिंग वाईट असेल तर काही उपयोग नाही. मी ज्यावेळी काशिनाथ घाणेकर पाहिला तो मला आवडला. तो ज्यानं बनवला त्यामुळे मी अभिजित यांची भेट घेतली.

Sharad Pawar : अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, भाजपने उमेदवार देऊ नये ; शरद पवार

Exit mobile version