राज ठाकरे चार दिवसीय दौऱ्यासाठी निघाले एक्सप्रेसने

आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रत्येक पक्ष जोरदार तयारी करत आहे. एकीकडे महाविकास आघाडी या निवडणूका एकत्र लढणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तर दुसरीकडे मिशन मुंबई म्हणत भाजपने देखील आता निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले आहे.

राज ठाकरे चार दिवसीय दौऱ्यासाठी निघाले एक्सप्रेसने

आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रत्येक पक्ष जोरदार तयारी करत आहे. एकीकडे महाविकास आघाडी या निवडणूका एकत्र लढणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तर दुसरीकडे मिशन मुंबई म्हणत भाजपने देखील आता निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले आहे. तर आता मनसे देखील आपली तयारी सुरु केली आहे आणि या तयारीची सुरुवात मनसे प्रमुख राज ठाकरे विदर्भ दौरयाने करणार आहेत. तर आज महाराष्ट्र नवनिर्मण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला अखेर सुरवात हि झाली आहे.

हे ही वाचा : महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात राज ठाकरे आखणार रणनिती; तब्बल 6 दिवस करणार विदर्भ दौरा

आज दि १७ सप्टेंबर रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्याला जाण्यासाठी सीएसएमटी स्थानकांजवळ पोहचले आहेत आणि काही क्षणात ते सीएसएमटी वरून एक्सप्रेसने नागपूरला जातील. याक्षणी सीएसएमटी स्टेशनवर मनसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

१७ सप्टेंबरला सायंकाळी रेल्वेने ते नागपूरसाठी (Nagpur) प्रयाण करतील आणि १८ ला सकाळी त्यांचे नागपुरात आगमन होईल. त्यानंतर तब्बल सहा दिवस म्हणजे २३ तारखेपर्यंत ते विदर्भात असणार आहेत. नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती महानगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भात ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. पक्ष संघटन वाढविणे, हादेखील या दौऱ्यामागील उद्देश आहे. या दौऱ्यात ते नागपूर, चंद्रपूर व अमरावती येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी महानगर पालिका निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करून मार्गदर्शन करणार आहेत.

राज ठाकरेंचा दौरा?

१८ व १९ सप्टेंबर – नागपुर (Nagpur)
२० सप्टेंबर – चंद्रपूर (Chandrapur)
२१ व २२ सप्टेंबर – अमरावती (Amravati)
२३ सप्टेंबर – अमरावतीहून मुंबईसाठी रवाना होतील

 

हे ही वाचा:

Kabza Teaser Released: पहा कसा आहे कब्जाचा टीझर! उपेंद्र आणि आर. चंद्रू पुन्हा येणार एकत्र

तिरुपती बालाजी मंदिराला भेट देत मुकेश अंबानींनी दिली ‘इतक्या’ कोटींची देणगी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version