Raj Thackeray : राज ठाकरे कोकण दौऱ्यावर, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बांधणीवर जोर

Raj Thackeray : राज ठाकरे कोकण दौऱ्यावर, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बांधणीवर जोर

राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका लागतील त्यामुळे सज्ज राहा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले होते. आता उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा निवडणुकीचे संकेत दिले आहेत. राज्यात लवकरच निवडणुका लागतील असं भाकित राज ठाकरे यांनी वर्तवलं आहे. तर राज ठाकरे यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात लवकरच कोणत्या निवडणुका होणार आहेत याचे नवे तर्कवितर्क लावले जात आहे.

हेही वाचा : 

Children Day 2022 : बालदिनानिमित्त चाचा नेहरू आणि बालकांच्या काही खास आठवणी

राज ठाकरे ह्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बांधणीवर जोर देत आहेत. आता राज ठाकरे हे कोकणातील जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहे. कोकण दौऱ्याचीसुरुवात ही डिसेंबपासून होणार आहे. तसेच राज ठाकरे राज्याच्या विविध भागांचा दौरा करणार आहेत. त्याची सुरूवात त्यांनी विदर्भ दौऱ्यापासून केली होती. आता राज ठाकरे विदर्भानंतर कोकण दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, पक्षसंघटन बळकट करणं यावर राज ठाकरे लक्ष केंद्रीत करणार आहेत.

दरम्यान, राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केलीय. आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसेने कसून तयारी सुरू केलीय. त्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आलीय. त्यात राज ठाकरेंनी चांगलंच झापलंय. योग्य पद्धतीने काम करायचं नसेल तर पदावरुन दूर व्हा या शब्दात राज ठाकरेंनी पदाधिका-यांना खडसावलंय.

Jitendra Awhad : तक्रारदार महिलेनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, अन सारी चक्रं फिरली; जितेंद्र आव्हाडांचा दावा

काल मुंबईतील परळमधल्या कामगार मैदानात मनसेतर्फे कोकण महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाची सांगता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, मी आता भाषणाला उभा नाही. मी सध्या घशाला आराम देतो. कारण जानेवारीपासून बोंबल बोंबल बोंबलायचंच आहे. निवडणुका लागतील. घसा एवढ्यासाठीच बोललो कारण गळा हा लता मंगेशकर वगैरे या लोकांसारखा असतो. घसाच आपला असतो. त्यामुळे घशाला जरा आराम देतोय, असं राज ठाकरे म्हणाले.

भारत जोडो यात्रेत काँग्रेसबरोबर जनताही रस्त्यावर उतरल्याने भाजपाचा जळफळाट ; नाना पटोले

Exit mobile version