भाजप-सेनेच्या स्नेहभोजनाच्यावेळीच राज ठाकरे पोहोचले वर्षावर

राज ठाकरे भाजप-शिवसेनेच्या बैठकीवेळी वर्षावर जात असल्यामुळे पुन्हा एकदा तिन्ही पक्षांच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

भाजप-सेनेच्या स्नेहभोजनाच्यावेळीच राज ठाकरे पोहोचले वर्षावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) , भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) शिवसेनेचा गट यांच्यातली जवळीक गेल्या काही दिवसांपासून वाढत चालली आहे, आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं होतं. तसंच मागच्या काही दिवसांमध्ये भाजप नेतेही अनेकवेळा राज ठाकरेंच्या घरी गेले होते. तेव्हापासून या तिन्ही पक्षांमध्ये होत असलेल्या जवळीकीची चर्चा सुरू झाली आहे.त्यातच आता राज ठाकरे यांनी अचूक टायमिंग साधलं आहे आणि ठाकरेंच्या याच टायमिंगची चर्चा सगळीकडे होत आहे.

राज ठाकरे हे एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर गणपतीचे दर्शन घेण्यासाठी वेळेआधीच पोहोचले आहेत. पण, वर्षा बंगल्यावर मात्र आज भाजप आमदार आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेते तसंच आमदारांच्या स्नेहभोजनाचा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. तर हेच अचूक टायमिंग साधत राज ठाकरे वर्षा बंगल्यावर पोहोचल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. तसेच भाजप-शिवसेनेच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमालाही राज ठाकरे उपस्थित राहणार का? असा सवालही आता केला जात आहे.

कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांचा मुंबई दौरा संपवून पुन्हा दिल्लीला गेले. या दौऱ्यात अमित शाह यांनी शिवसेनेला टोला लगावत येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. अमित शाह यांच्या मिशन मुंबईच्या दौऱ्यानंतर एकाच दिवसात राज ठाकरे भाजप-शिवसेनेच्या बैठकीवेळी वर्षावर जात असल्यामुळे पुन्हा एकदा तिन्ही पक्षांच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

हे ही वाचा:

ललित मोदी-सुष्मिता सेनच्या ब्रेकअपची बातमी ऐकून युजर्सला झाला आनंद ,फनी मीम्स झाले व्हायरल

Exclusive : ‘हा’ बडा नेता गुरुवारी जाणार शिंदे गटात, डॉ श्रीकांत शिंदे यांच्या शिष्टाईला यश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version