spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

टोलनाकासंदर्भात Amit Thackeray वर टीका करणाऱ्या भाजपाला Raj Thackeray नी दिले प्रत्युत्तर, म्हणाले…

नाशिक येथील सिन्नर मध्ये झालेल्या टोल तोडफोड प्रकरणासंदर्भात राज ठाकरे यांनी भाजप वर हल्लाबोल हा केला आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे आज दिनांक १६ ऑगस्ट रोजी पनवेलमध्ये सकाळी ११ वाजता पक्षाचा निर्धार मेळावा घेणार आहेत. यात राज ठाकरे यांचे जाहीर भाषण देखील होणार आहे. या मेळाव्यात मुंबई-गोवा महामार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना एल्गार पुकारणार असल्याचे मनसेकडून जाहीर करण्यात आले आहे. यासंबंधिच्या पोस्टर्समध्ये ‘रखडेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेचा निर्धार मेळावा’ असल्याचे म्हटले आहे. तसेच आजच्या या मेळाव्यात राज ठाकरे यांनी अनेक मुद्दे हे मांडले आहेत. यावेळी नाशिक येथील सिन्नर मध्ये झालेल्या टोल तोडफोड प्रकरणासंदर्भात राज ठाकरे यांनी भाजप वर हल्लाबोल हा केला आहे.

यावेळी बोलत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत की, आमच्यावर टीका करणाऱ्या भाजपाने आधी इतरांचे आमदार न फोडता स्वतःचा पक्ष उभा करायला शिकावं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. तसेच राज ठाकरे पुढे म्हणाले आहेत की, “त्या दिवशी आमचा अमित कुठेतरी जात होता. त्यावेळी टोलनाका फुटला. त्यावर लगेच भाजपाने टीका सुरू केली. भाजपाने म्हटलं की, रस्ते बांधायलाही शिका आणि टोल उभे करायलाही शिका. मला असं वाटतं की, भाजपाने दुसऱ्यांचे आमदार न फोडता स्वतःचा पक्ष उभा करायलाही शिकावं.”

“लोकांच्या डोक्यावर बंदुका ठेवायच्या आणि त्यांना पक्षात आणायचं. त्यानंतर ती लोक गाडीत झोपून जाणार. यानंतर म्हणणार, ‘मी तुला गाडीत दिसलो का, मी झोपलो होतो का, मी होतो का.’ म्हणजे महाराष्ट्रात निर्लज्जपणाचा कळस सुरू आहे,” असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं. “तुम्ही या सरकारमध्ये का आलात असं विचारलं की, म्हणतात मला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. अरे कशाला खोटं बोलता. ६ दिवसांपूर्वी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. त्यानंतर हे सगळे टुणकन भाजपाबरोबर आले,” असाही आरोप राज ठाकरेंनी केला.

 

नेमकं काय प्रकरण होत?

दिनांक २३ जुलै रोजी महराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र मनसे नेते अमित ठाकरे यांची गाडी समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर अडवण्यात आली. ही गाडी अडवल्यामुळे काही तासानंतर या टोलनाक्याची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या वादांनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. तर या तोडफोडीनंतर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी मनसेवर जोरदार टीका सुरू केली होती. मनसेने रस्ते बांधायला आणि टोलनाके उभे करायलाही शिकावं असं म्हणत हल्लाबोल केला. तर या सर्व आरोपांवर आज दिनांक १६ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

हे ही वाचा:

Chandrayaan-3 सॉफ्ट लँडिंगपासून केवळ एका कक्षेच्या अंतरावर, जाणून घ्या सविस्तर…

पनवेलमध्ये मनसेचा आज निर्धार मेळावा, काय बोलणार Raj Thackeray?

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाची इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करणारे मुंबईतील दोन तरुण अटकेत…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss