Raj Thackeray यांनी केली कार्यकर्त्यांना विनंती

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. महाराष्ट्रामधील अनेक जनतेने राज ठाकरेंना सोशल मीडियाच्या मार्फत शुभेच्छा दिल्या.

Raj Thackeray यांनी केली कार्यकर्त्यांना विनंती

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. महाराष्ट्रामधील अनेक जनतेने राज ठाकरेंना सोशल मीडियाच्या मार्फत शुभेच्छा दिल्या. रात्री १२ वाजल्यापासून राज्यभरामध्ये कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या मुंबईमधील निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. राज ठाकरे यांनी देखील त्यांच्या निवासस्थानाबाहेर येऊन कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी राज ठाकरे यांना अनेक भेटवस्तू देण्यात आल्या. रात्री राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी उत्तर मुंबईमधील कार्यकर्ते शिवतीर्थावर उपस्थित होते.

राज ठाकरे यांना कार्यकर्त्यांनी दिलेल्या शुभेच्छा स्वीकारल्या खऱ्या पण त्यांनंतर त्यांना एक विनंतीही केली. त्यामुळे आता राज ठाकरे यांनी केलेल्या विनंतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. निवासस्थान शिवतीर्थावर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या नावाच्या घोषणाबाजी सुरुवात केली. त्यानंतर राज ठाकरे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी बाहेर आले आणि त्यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना एक विनंती केली आहे.

राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यानाविनंती केली आहे की राज ठाकरे यांचा नातू कियान आजारी आहे त्यामुळे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आरडाओरडा न करण्याची विनंती केली आहे. विनंती करताना राज ठाकरे म्हणाले की, कियानला ताप आहे. तो आजारी आहे, तो झोपलाय, त्यामुळे जास्त आरडाओरडा करू नका.”, असं म्हणत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याची विनंती केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आणलेला केक राज ठाकरेंनी कापला आणि त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.

हे ही वाचा:

शिवसेनेकडून जाहिरातबाजी : कोणता नेता आहे अधिक लोकप्रिय ?

या आंब्याची किंमत ऐकून भुवया होतील आश्चर्याने उंच …

आषाढीसाठी विठुरायाच्या दगडी मुर्त्या बाजारात सज्ज; लाखो रुपयांची उलाढाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version