Raj Thackeray: प्रबोधनकारांच्या पुण्यतिथीदिनी राज ठाकरेंची केली खास पोस्ट शेअर

Raj Thackeray: प्रबोधनकारांच्या पुण्यतिथीदिनी राज ठाकरेंची केली खास पोस्ट शेअर

आज प्रबोधनकार ठाकरे यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिवादन करत एक पोस्ट लिहिली आहे. ‘आजोबांनी दिलेला ‘ठाकरी’ बाणा, जो पुढच्या पिढीत आला आणि माझ्यातपण आला’ असं राज ठाकरे म्हणाले.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या आजोबांसोबतच एका फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी आजोबांनी शिकवलेल्या गोष्टींना राज ठाकरेंनी उजाळा देत फेसबूक पोस्टमध्ये लिहलं, आज आमच्या आजोबांची – प्रबोधनकारांची पुण्यतिथी. अन्याय दिसला तर लाथ मारायची, जे खरं असेल ते ठासून मांडायचं, आणि हे करताना नफा, नुकसान असल्या क्षुल्लक गोष्टींचा विचार करायचा नाही, हा आजोबांनी दिलेला ‘ठाकरी’ बाणा, जो पुढच्या पिढीत आला आणि माझ्यातपण आला. मी आजोबांनी रुजवलेला हा ठाकरी बाणा कायम कटाक्षाने अंमलात आणायचा प्रयत्न करत आलोय आणि पुढे पण करत राहीन. आणि हेच बाळकडू पुढे पण देईन हे नक्की, असा विश्वास व्यक्त करतानाच राज यांनी आजोबांच्या स्मृतीस अभिवादन केलं आहे.

हेही वाचा : 

राज्यपालांना तीन वर्षांनंतरही महाराष्ट्र कळत नसेल तर राज्यपालपदी राहण्याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ… ; अजित पवार

१७ सप्टेंबर २०१० रोजी प्रबोधनकारांच्या १२५ व्या जन्मदिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ‘पद्मश्री’ नामदेव ढसाळ यांच्या हस्ते ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ ह्या संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. संकेतस्थळाचे उद्घाटन झाले होते. आता बदलत्या तंत्रज्ञानानुसार प्रबोधन प्रकाशनचे हे संकेतस्थळ नव्या स्वरूपात आणले जात असून त्याचे लोकार्पण उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते केले जाणार आहे. सायंकाळी साडे सात वाजता दादर येथील शिवाजी मंदिरात हा सोहळा होणार आहे.

 

पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांकडून राज कुंद्राविरोधात पुरवणी आरोपपत्र महानगर दंडाधिकारी कोर्टात दाखल

प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ रोजी पनवेल येथे झाला. प्रबोधनकार यांनी आपले प्राथमिक शिक्षण पनवेल येथून पूर्ण केले. पुढे देवास येथे त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले. वडिलांची नोकरी गेली आणि पनवेलमध्ये पुढील शिक्षणाची व्यवस्था नसल्याने त्यांचे शिक्षण थांबले. त्यामुळे त्यांना कधी बारामतीत तर कधी मध्य प्रदेशातील देवासमध्ये धाव घ्यावी लागली. दीड रुपये फी कमी पडल्याने ते मॅट्रिकची परीक्षा देऊ शकले नाहीत आणि त्यांचे वकील होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. त्यांनी साईन बोर्ड पेंटिंग, रबर स्टॅम्प बनवणे, बुक बाइंडिंग, वॉल पेंटिंग, फोटोग्राफी, मशीन मेकॅनिक इत्यादी उद्योग केले. त्यांनी अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत. त्यांनी संपूर्ण हायतभर लोकांचे वैचारिक प्रबोधन करण्यासाठी साहित्य निर्मिती केली.

BJP : राज्यपालांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर अखेर भाजपनं दिली प्रतिक्रिया

Exit mobile version