spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज ठाकरेंनी दिला जैन समाजाच्या मागणीला पाठिंबा

झारखंडमधील सम्मेद शिखरजी या तीर्थक्षेत्राला पर्यटनस्थळ घोषित करण्यात आला आणि त्यामुळे देशभरातून जैन समाजाचा विरोध वाढत चालला आहे.

Raj Thackeray on Sammed Shikharji : झारखंडमधील सम्मेद शिखरजी या तीर्थक्षेत्राला पर्यटनस्थळ घोषित करण्यात आला आणि त्यामुळे देशभरातून जैन समाजाचा विरोध वाढत चालला आहे. सम्मेद शिखरजी (Sammed ShiKharji) हे पर्यटनस्थळ झारखंडमधील गिरडीह जिल्ह्यातील मधुबन भागात आहे. याला भागाला पारसनाथ पर्वत असेही म्हणतात. या पर्वाला जैन धर्मात विशेष महत्व असते. सम्मेद शिखरजी या तीर्थक्षेत्राला पर्यटनस्थळ घोषित केल्यानंतर अनेक आंदोलन, मोर्चा करण्यात आला. तसेच मोठ्या प्रमाणात जैन समाज गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर उतरला आहे. परंतु आता या समाजाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जैन समाजाला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच पाठिंबा देत असताना झारखंड सरकारने निर्णय मागे घेण्याचे आवाहन देखील केले आहे. तसे न झाल्यास केंद्र सरकारने त्वरित हालचाल करून निर्णय घ्यावा. असं राज ठाकरे म्हणाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे आणि त्या ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत कि, झारखंडमधल्या गिरीहीद जिल्ह्यातलं ‘सम्मेद शिखरस्थळ’ हे जैन धर्मियांचं पवित्रस्थळ आहे. ह्या धर्मस्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊ नये, कारण एकदा का ते पर्यटनस्थळ म्हणून घोषित झालं की तिथे जैन धर्माला मान्य नसलेल्या अनेक गोष्टी घडू शकतील अशी जैन बांधवांची भावना आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जैन बांधवांच्या मागणीशी पूर्ण सहमत आहे. झारखंड सरकारने जैन धर्मियांच्या तीव्र भावनांचा विचार करून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, आणि हे होत नसेल तर केंद्र सरकारने ह्यात त्वरित हालचाल करावी. असं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे.

महाराष्ट्रातील जैन समाज पर्यटनस्थळाचा दर्जा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे. जैन धर्मियांनी महाराष्ट्रातील मुंबई, दक्षिण मुंबई, पुणे, अमरावती, कोल्हापूर या ठिकाणी मोर्चा काढत झारखंड सरकारला निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. कोल्हापूरमध्ये जैन समाजाकडून विराट मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून प्रसंगी दिल्लीला धडक देण्याचा इशारा जैन समाजाने दिला आहे.

हे ही वाचा:

एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये मद्यधुंद प्रवाशाने वृद्ध महिलेवर केला लघवी, एअरलाईनने केली कडक कारवाई

‘एव्हरग्रीन मित्रा’ ने पाकिस्तानला फसवले, चीनमधून आयात केलेल्या रेल्वेच्या बोगींमुळे पाकिस्तान नाराज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss