spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Raj Thackeray: भाजपच्या मतपरिवर्तनानंतर राज ठाकरेंनी मानले फडणवीसांचे आभार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल रविवारी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून भाजपने अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवार देऊ नये, अशी मागणी केली होती. महाराष्ट्राच्या राजकीय, सांस्कृतिक परंपरेला अनुसरुन आणि स्व. रमेश लटके यांचे काम पाहता उमेदवार देऊ नये, असं राज ठाकरे यांनी पत्रामध्ये म्हटले. त्यानंतर आज उमेदवारीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनखुळेंनी पोटनिवडणुकीतून भाजप माघार घेत असल्याची घोषणा केली. भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्रातचे प्रभारी यांच्यासोबतच्या बैठकीनंतर भाजपच्या गोटात जोरदार हालचाली दिसून आल्या. त्यानंतर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी माध्यमांशी संवाद साधताना भाजप पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं.

हेही वाचा : 

Andheri By-election 2022 : निवडणूक बिनविरोध लढवण्याच्या निर्णयावर प्रभाव कोणाचा? ठाकरे की पवार

भाजपच्या या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा पत्र लिहत त्यांचे आभार मानले आहते. ठाकरेंनी आपल्या पात्रात म्हटले, काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) च्या पोट-निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात ह्याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार. असे म्हणत राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.

शरद पवार यांचे भाजप पक्ष श्रेष्ठींना साकड

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील अंधेरी पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करू नका, कारण रमेश लटके यांचं योगदान पाहता ही निवडणूक बिनविरोध होणे गरजेचं आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर आम्हीही उमेदवार दिला नव्हता त्यामुळे भाजपने उमेदवार देऊ नये, अर्ज मागे घेण्याची मुदत अजून संपलेली नाही. एका वर्षासाठी निवडणुका नको असं म्हणत पवारांनी सर्वपक्षीय आवाहन केलं होतं.

Latest Posts

Don't Miss