Raj thackeray : राज ठाकरे अयोध्येला जाणार?, अयोध्येतील महंतीच्या भेटीनंतर चर्चेला उधाण

Raj thackeray : राज ठाकरे अयोध्येला जाणार?, अयोध्येतील महंतीच्या भेटीनंतर चर्चेला उधाण

मागच्या काही महिन्यांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मस्जिदवरच्या भोंग्यांवरून त्यांनी जाहीर भाषणांमधून भूमिका मांडली. काही दिवसांआधी ते अयोध्या दौऱ्यावरही जाणार होते. पण उत्तर प्रदेशमधील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला. राज ठाकरेंनी आधी उत्तर प्रदेशमधील लोकांची माफी मागावी. मगच अयोध्येला यावं, असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलं. त्यानंतर राज ठाकरेंनी आपला अयोध्या दौरा रद्द केला. आता पुन्हा एकदा राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

पुन्हा जन्म घेईल, झेपावेल, उसळेल, दुष्मनांच्या नरडीचा… ; सामना अग्रेलेकातून टीकास्त्र

राज ठाकरे यांना अयोध्येला बोलावण्यासाठी अयोध्येतील हनुमान गढी महंत राजुदास महाराज,महंत धरमदास आणि विश्व हिंदू सेवा संघाचे अध्यक्ष रवींद्र द्विवेदी हे मुंबईत आलेत. त्यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली. यावेळी या महंतांनी राज यांना अयोध्येला येण्याचं निमंत्रण दिलं आहे. राज ठाकरे यांच्याशी आमची चांगली भेट झाली. विविध विषयांवर चर्चा झाली. आम्ही त्यांना अयोध्येला येण्याचे निमंत्रण देखील दिले आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की, काही दिवसांआधीच मी अयोध्येला येणार होतो. पण काही कारणास्तव आम्ही येऊ शकलो नाही.पण मी आता येईल, असं राज ठाकरेंनी आश्वासन दिल्याचं महंत राजुदास महाराज यांनी सांगितलं.

मुंबईकरांनो सावधान ! शहरात पसरलीये डोळ्याची साथ…

राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, सध्या हा दौरा स्थगिती करून भविष्यात राज ठाकरे यांच्याकडून अयोध्या दौऱ्याची नवी तारीख जाहीर केव्हा जाईल असा प्रश्न जनतेच्या मनात आहे. याबाबत मनसेकडून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. राज ठाकरे हे लवकरच मनसेच्या प्रमुख नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना शिवतीर्थवर पाचारण करून याबाबत माहिती देऊ शकतात.

मनसेकडून मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

मनसेकडून मुंबईपालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. मनसेची उद्या रंगशारदामध्ये महत्वाची बैठक होणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत राज ठाकरे या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीवेळी पदाधिकाऱ्यांना वॉर्डनिहाय नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

India-Africa ODI Series : श्रेयसने शतक ठोकले तर, ईशानने रोहित व गांगुलीला विक्रम मोडला

Exit mobile version