spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Raj Thackeray Vision Worli: Sandeep Deshpande हा राजकीयदृष्ट्या जागृत आणि अभ्यासू मुलगा, तो आमचा हिरा! ठाकरेंकडून देशपांडेंचे कौतुक

सध्या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना राज्यात रंगणार आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) या निवडणुकीत ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी 7 उमेदवारांची घोषणा केली आहे. आता राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तयारी करण्याची सुरुवात केली आहे.

मुंबईत मनसे पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. त्यात वरळी मतदारसंघात मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) निवडणुकीत उभे राहण्याची चिन्ह असताना आता काही महिन्यांपासून संदीप देशपांडे यांचा वरळी मतदारसंघातील वावर वाढला आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ‘व्हिजन वरळी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात होता. माझं व्हिजन, तुमचं व्हिजन, आपलं व्हिजन, व्हिजन वरळी (Vision Worli) या कार्यक्रमाचा उ‌द्घाटन समारंभ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शनिवार २१ सप्टेंबर २०२४, जांबोरी मैदान, वरळी येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी वरळीतील नागरीकांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले होते. तसेच समस्या तुमची, उत्तरं मनसेची! अशी या कार्यक्रमाची टॅगलाईन होती. यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना मनसे नेते संदीप देशपांडे यांचे कौतुक केले.

काय म्हणाले राज ठाकरे?

संदीप देशपांडे हा राजकीयदृष्ट्या जागृत आणि अभ्यासू मुलगा आहे. जे घडू शकतं त्याला हो म्हणणारा आहे आणि जे घडू शकत नाही त्याला नाही म्हणणारा आहे. तो आमचा हिरा आहे. त्याने जे व्हिजन वरळी प्रदर्शन सुरु केलं आहे, ते नीट शांतपणे बघा. बाहेरचे येऊन इथे पुन्हा सगळी वाट लावली आहेत आणि लावतील हे विसरू नका. संदीपसारखे जे चांगलं काम करणारे आहेत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप बसणार आहे का नाही? की ज्यांनी राजकीय आणि सामाजिक गोंधळ घातला आहे त्यांना परत संधी देणार का? वरळी खूप सुंदर भाग आहे. या वरळीसाठी जे जे माझ्याकडून होणं शक्य आहे ते होईल, ते ते मी करेन आणि या बाबतीत मला बिनदिक्त गृहीत धरा.

हे ही वाचा:

संजय राऊत यांचा सरकारला टोला, नेहरु आणि इंदिरा गांधींच्या चरणाचे तीर्थ…

Bigg Boss Marathi Season 5: Sangram Chougule पोस्ट करत म्हणाला, घरातून बाहेर जावं लागलं पण….

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss