spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Raj Thackeray मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्र लढणार, राज ठाकरे

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. ते आज दुपारी पुण्याहून कोल्हापूरला (kolhapur) पोहचले .

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. ते आज दुपारी पुण्याहून कोल्हापूरला (kolhapur) पोहचले . तब्बल ५ वर्षानंतर राज ठाकरे हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागताची कोल्हापूरकरांनी जोरदार तयारी केली होती. त्या नंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला

राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी माध्यमांनी रणनीती बाबत प्रश्न विचारले असता राज ठाकरे म्हणाले, असं कोणी सांगत का हि आमची रणनीती आहे. तसेच पुढे ते म्हणाले, शेवटी कुठलाही लढा हा प्रस्थापितांच्या विरोधात असतो आणि शेवटी एक वेळ अशी येते कि, प्रस्थापितांच्या विरोधात लढा दिल्यांनतर त्याला यश हे आलेलं आहे. हे ९५ – ९९ च्या काळात झालेले आहे. त्यामुळे कोणाचे बालेकिल्ले हलत नाही असं नाही बालेकिल्ले हे हलत असतात. ते या पुढेही हालत असे राज ठाकरे म्हणाले आहेत. तसेच ते पुढे म्हणाले , प्रत्येक पक्षाचं एक अंतर्गत काम असत आमचं आमचं काम आमही करत आहोत. आमचं लक्ष आहे. असे देखील राज ठाकरे म्हणाले आहेत.

तसेच मुंबई महानगर पालिकेमध्ये मनसेची भूमिका हि स्पष्ट असणार असे आहे असे देखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मी केवळ माझ्या पक्षासाठी काम करतो कुणासाठी काम करत नाही. अनेक वेळा कम्युनिकेशन गॅप असतो, तो भरून निघतो, कधी निघत नाही. सीमाभागाचा प्रश्न आताच कसा बाहेर येतो? असा सवाल राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. सीमावादाच्या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, सीमाप्रश्न अचानक कसा मधेच येतो. म्हणजे कुठल्या तरी गोष्टीकडून आपलं लक्ष वळवायचं आहे का कोणाला? ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. हा विषय सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यावर दिल्लीत आता बैठकही झाली. त्यामुळे हा हे प्रकरण न्यायालयात आहे. न्यायालय यावर निर्णय देईल. ते म्हणाले, मूळ बातमीपासून लक्ष वळवण्याचा हा प्रयत्न आहे का? याचा शोध घ्यायला हवा.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. “मी त्या माणसाबद्दल काय बोलावं ते कळतंच नाही. ते अशा एका पदावर आहे की ज्यामुळे आपण काही बोलू शकत नाही. नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाहीय”, असा घणाघात राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केला. “राजकारणात असे अनेक लोकं आहेत जी काही पदांवर बसलेली आहेत. असे अनेक माणसं आहेत, ज्यांना पद येते पण पोहोच येत नाही. त्यातली ही माणसं आहे”, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

“पदावरती बसतात पण कधी कुठली गोष्टी काय बोलावं याबद्दल कळत नाही. मागच्यावेळी ते जोतिबा फुले आणि महात्मा फुले यांच्याबद्दल बोलले होते. हे छोटे-छोटे बच्चे तब ये शादी करते, कैसे करते होगे? कैसे म्हणजे पूर्वीच्याकाळी लहान मुलांचं लग्न व्हायचं. कोश्यारींचं अजून नाही झालं”, अशी खोचक टीका राज ठाकरेंनी केली. “मला तर असं वाटतं की अशा लोकांना म्हणजे राज्यपालांनाही कोणी स्क्रिप्ट देतं का? तुमचं सगळं लक्ष दुसरीकडे केंद्रीय करण्यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत का? बऱ्याचदा महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी हे असे प्रकार केले जातात”, असं राज ठाकरे म्हणाले. “मुर्ख माणसं आहेत. आपल्या महाराजांना याने काही फरक पडत नाही. ही कोण माणसं आहेत? या लोकांना टेलिव्हिजनवर जागा देऊ नका. पण तुम्ही थांबत नाहीत”, असं राज ठाकरे पत्रकारांना म्हणाले.

हे ही वाचा : 

शिवशक्ती आणि भीमशक्ती येणार एकत्र, रेखा ठाकूर यांची माहिती

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss