spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बाप्पासमोर दसऱ्याचा प्लॅनिंग ?, आज राज ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेने अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या वरचेवर होणाऱ्या भेटी या होत आहेत. तसेच मनसे-भाजप युतीचं द्योतक ठरत आहेत. अश्यात युतीचा महत्वपूर्ण भाग असलेले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राज ठाकरे यांचीही जवळीक आता वाढताना दिसत आहे. याआधी मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या शीवतीर्थ या निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते. आता राज ठाकरे वर्षा बंगल्यावर जात शिंदेंची भेट घेणार आहेत. गणेशोत्सव सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्री निवासस्थानच्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे जाणार आहेत. आज संध्याकाळी साडे सहा वाजता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) भेट घेतील. यानंतर वर्षा बंगल्यावरील बाप्पाचं दर्शन सुद्धा घेणार आहे.

अगदी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी शिवतीर्थावरील बाप्पाचं दर्शनही घेतलं होतं. यानंतर माध्यमांसोबत बोलताना ही भेट राजकीय नव्हती असं शिंदेंनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सहकुटुंबासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाणार असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांमधील भेटीगाठी वाढत असल्याने राजकीय वर्तुळातून तर्क वितर्क लावले जात आहेत. मुंबई महापालिका निवडुकीच्या तोंडावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही युती होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

तसेच दसरा मेळाव्यात देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांना विशेष अतिथी म्हणून बोलवण्याच्या चर्चा होत्या. मात्र काल मुख्यमंत्र्यांनी बोलताना सध्या तरी असा विचार नसल्याचे सांगितले. मात्र, दसरा मेळाव्यात हे दोघे नेते एकत्र येतील का? हे पाहावे लागेल.

हे ही वाचा:

‘बॉयकॉट बॉलीवूडच्या’ ट्रेंडमध्ये, ४०० कोटींचा ‘ब्रम्हास्त्र’ चे नक्की होणार तरी काय ?

‘… ४५ हून जास्त जागा निवडून आणण्याचं लक्ष्य ‘, चंद्रशेखर बावनकुळे

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss